Koyana-Dam sakal
सातारा

सातारा : कोयना धरणग्रस्तांच्या भूखंड गैरव्यवहाराची शासनानं घेतली दखल

9 नोव्हेंबरला मंत्रालयात बैठक

विजय लाड ः सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर : राज्याच्या विकासाचे सैनिक असणाऱ्या कोयना पुत्राच्या पर्यायी जमीन वाटपात मोठा घोटाळा उघड झाला आहे.२,६२८ खातेदारांना दुबार तर ३,५३० खातेदारांना अतिरिक्त जमीन वाटप झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.६ हजार १५८ बोगस खातेदारांना सोलापूर ,सातारा रायगड येथे जमीन वाटप झाली असल्याची शासकीय आकडेवारी असून बोगस वाटप झालेली जमीन संबधित खातेदारांनी शासनाकडे तातडीने परत करावी अन्यथा त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचे पत्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले असल्याने एकच खळबळ माजली आहे.कोयना प्रकल्पग्रस्तांचा भूखंड वाटपाचा घोटाळा चव्हाट्यावर आल्याने शासनाने या प्रश्नी ९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात मीटिंग आयोजित केली आहे.

राज्याच्या विकासाचे महाशिल्प असणाऱ्या कोयना धरणातील बाधित प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी तब्बल साडे सहा दशकानंतर शासनाने तयार केली आहे.या महाशिल्पासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण ,जावळी ,महाबळेश्वर या तीन तालुक्यातील ९८ गावातील १८७ गावठाणातील ९,८०० खातेदार शासन दरबारी नोंदले गेले होते.तर अनेक पात्र खातेदार पात्र असूनही अपात्र राहिले आहेत.कोयना धरणासाठी त्याग करणारे धरणग्रस्त अद्याप वंचितच आहेत.

श्रमिक मुक्ती दलाच्या झेंडयाखाली सात वर्षापासुन कोयना पूत्राचा न्याय हक्काचा लढा सुरूच आहे.३० ऑक्टोबर पर्यंत प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी जाहीर करण्यात यावी असे आदेश शासनाने निर्गमित केले होते.मुदत संपल्या बरोबर सातारा जिल्हा प्रशासनाने कोयना प्रकल्पग्रस्त खातेदारांना जादा वाटप केलेली जमीन काढून घेण्याची प्रक्रिया १ नोव्हेंबर पासून चालू केली आहे. ज्या खातेदारांना दुबार व अतिरिक्त जमिनीचे वाटप झाले आहे.त्या खातेदारांना सातारा जिल्हाधिकारी यांच्या वतीने डबल व अतिरिक्त वाटप झालेली जमीन परत करावी अन्यथा त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे नोटीस दिल्यामुळे ५ जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

दै. सकाळने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर या वृत्ताची दखल शासनाने घेवून या प्रश्नी मंत्रालयात ९ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही बैठक आयोजित केली आहे.डबल व अतिरिक्त वाटप झालेली जमीन सरकार जमा करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT