Satara  sakal
सातारा

Satara : पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिसाला;कृष्णा- कोयना काठचा पुराचा धोका टळला

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने शनिवारी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोयना धऱणातुन करणाऱ्यात येणारा ३० हजार क्युसेक विसर्ग स्थिर ठेवण्यत आला आहे.

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने शनिवारी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोयना धऱणातुन करणाऱ्यात येणारा ३० हजार क्युसेक विसर्ग स्थिर ठेवण्यत आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने पुराचा धोका टळळ्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग दहा दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने तीन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला आहे. या आठवड्यात दररोज सरासरी चार ते पाच टीएमसी पाण्याची आवक होत होती. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूटाने उचलून कोयना नदी पात्रात धरणाच्या सांडव्यावरून १० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली होती.

मात्र पाण्याची आवक जलाशयात प्रति सेकंद ८५ हजार क्युसेक्स पेक्षा जास्त होत होती. त्यामुळे दोन तासातच धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत उचलून २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात होता. धरणात होणारी पाण्याची आवक आणि धरणाचा एकूण पाणीसाठा याचा ताळमेळ बसत नव्हता त्यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणाचे दरवाजे सहा फुटांवर नेऊन कोयना नदीत ३० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला गेला.

सांडव्यावरुन ३० आणि पायथा वीज गृहातून दोन हजार १०० क्युसेक असा ३२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात होत आहे. दरम्यान काल रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्यने धरण्याती पाणी पातळी वाढली होती.

त्यामुळे धरण व्यवस्थापनाने आज शनिवारी सकाळी नऊ वाजता धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग ४० हजार क्युसेक्स पर्यंत वाढविण्याचे जाहीर केले होते. मात्र सकाळपासुन पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या धरणातील विसर्ग सहा फुटांवर स्थिर ठेवुन ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा-कोयना नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने पूरस्थितीचा धोका टळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT