Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar esakal
सातारा

कृष्णा हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद; राज्यमंत्री डॉ. भारती पवार

कोरोनाग्रस्त रुग्णांची परिवाराप्रमाणे घेतली काळजी

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाग्रस्त रुग्णांची परिवाराप्रमाणे घेतली काळजी

कऱ्हाड : कोरोनाच्या(corona) दोन्ही लाटेत कृष्णा(krishna hospital) अभिमत विद्यापीठासह कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णांची परिवाराप्रमाणे काळजी घेतली. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( dr. bharati pawar)यांनी केले. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी(atal bihari wajpayee) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सुशासन दिवस कार्यक्रमासाठी त्या कऱ्हाड दौऱ्यावर आल्या होत्या. मंत्री डॉ. पवार यांनी आज कृष्णा अभिमत विद्यापीठाला भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी स्वागत केले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, गौरवी भोसले उपस्थित होते. या वेळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलचे कौतुक केले. कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाकाळात खूप चांगले काम केले. फक्त कोरोनाग्रस्त रुग्णांचीच नाही, तर या रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचीही तितकीच काळजी घेतली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील कॅन्सर विभाग अद्ययावत असून, मुंबईनंतर सर्वप्रकारच्या अद्ययावत सेवा इथं उपलब्ध आहेत. याशिवाय इतर विभागही अद्ययावत असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे इस्पितळ एक वरदान ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. पवार यांचे सहायक डॉ. ओमप्रकाश शेटे, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

SCROLL FOR NEXT