सातारा

राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांचा केरळ ते काश्मीर सायकल प्रवास

हेमंत पवार

त्यांचा विजय दिवस समितीच्यावतीने विजय दिवस चौकात सत्कार करण्यात आला.

कऱ्हाड (सातारा): राष्ट्रीय एकात्मतेसाठी केरळ ते लेह लद्दाख-जम्मू काश्मीर असा सायकलवरून प्रवास करणाऱ्या केरळचे दोन युवक आणि एक युवती येथे पोहचल्या. त्यांचा विजय दिवस समितीच्यावतीने विजय दिवस चौकात सत्कार करण्यात आला.

भारत देश एक आहे, हा नारा घेवून राष्ट्रीय एकात्मतेसाठी केरळचे माशोर शान, महंमद स्थामील आणि सहला पाराप्पन हे तीघेजण केरळपासून लेह लद्दाख-जम्मू काश्मीर असा सायकलवरुन १०० दिवस प्रवास करणार आहेत. ते आज कर्नाटकातून कोल्हापुरहून येथे पोहचले. त्यावेळी त्यांचा विजय दिवस समितीच्यावतीने नगरसेवक विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक दिपक बेलवणकर, विजय दिवस समीतीचे सहसचिव विलासराव जाधव, प्रा. भगवान खोत, चंदु जाधव, रविराज जाधव, बाळासाहेब मोहिते, सुनिल बनसोडे, नितीन गोतपागर यांच्यासह मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनास, विजय दिवस समितीच्या कार्यालायास भेट दिली. त्यावेळी विलासराव जाधव, प्रा. खोत यांनी विजय दिवस आणि कऱ्हाडची माहिती दिली. त्यानंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT