सातारा

वनवासमाचीत रात्रीत चाेरट्यांनी फोडली पाच घरे; ग्रामस्थांत घबराट

सचिन शिंदे

कऱ्हाड : सदाशिवगडनजीकच्या वनवासमाचीत धुमाकूळ घालत चोरट्यांनी पाच घरे फोडली. एकाच घरातील तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी घरांना लक्ष्य करताना शेजारील घरांना कड्या घातल्याने गावात घबराट पसरली आहे. दिलीप पवार (रा. वनवासमाची) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामध्ये दोन लाख 86 हजारांचे सोने चोरीस गेल्याचे म्हटले आहे. अन्य चार शेजाऱ्यांचेही घरे फोडण्याचा प्रयत्न झाल्याचाही उल्लेख आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनवासमाचीत साेमवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. त्यात तब्बल पाच घरांना चोरट्यांनी टार्गेट केले होते. त्या ठिकाणी घरफोड्याचे प्रकार झाले. गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे शिरले. त्यांनी पाच घरे फोडली. त्यात दिलीप पवार यांच्या घरात सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. घरात शिरून चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडले. त्यातील सोन्या- चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख 86 हजारांचा ऐवज लंपास केला. सदाशिवगड- वनवासमाची येथील पाण्याच्या टाकीनजीक अमोल पवार यांच्या घरात तीन ते चार चोरटे शिरले. कपाट फोडल्यानंतर ड्राव्हरमधील सोन्याचे दागिने लंपास केले. 33 हजारांचे एक तोळे दोन ग्रॅमचे गंठण, 57 हजारांची एक तोळे नऊ ग्रॅमच्या सोन साखळीतील मिनी गंठण, 30 हजारांची एक तोळ्याची दोन कर्णफुले, 90 हजारांची तीन तोळ्यांची सोनसाखळी, सहा हजारांची दोन ग्रॅमची अंगठी, 69 हजारांची दोन तोळे सहा ग्रॅमची कर्णफुले, एक हजाराचे चांदीचे दोन ब्रेसलेट असा सुमारे दोन लाख 86 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे तपास करत आहेत. 

श्‍वानासह ठसे तज्ज्ञही पाचारण 

सदाशिवगड- वनवामाची येथे एकाच रात्री झालेल्या वेगवेगळ्या चोऱ्यांच्या तपासासाठी पोलिसांनी मंगळवारी दुपारी श्वान पथाकास पाचारण केले. साताऱ्याहून आलेल्या श्वान पथकास चोऱ्या झालेली ठिकाणे दाखविण्यात आली. तेथे पडलेल्या साहित्याचा वास देण्यात आला. त्या वासाने हे श्वान दिलीप पवार यांच्या घरापासून मुख्य रस्त्याकडे धावले. तेथे श्वान घुटमळले. चोरीसाठी वाहनांचा वापर झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. ठसे तज्ज्ञांनीही तेथे भेट देवून ठशांचे नमुने घेतले आहेत. तेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कुणाला कुठे उतरायचे तिथे उतरु द्या : उदयनराजे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT