सातारा

चोरीच्या पैशावर साताऱ्यात हकिम बनला शेठ!

गिरीश चव्हाण

सातारा : येथील पोवई नाक्‍यावर असणाऱ्या नवरंग दुकानात काम करताना साहिल हकिमने त्याठिकाणची रोकड चोरण्याचा सपाटा लावला. हजार-दोन हजार चोरणाऱ्या हकिमने नंतर नोटांची बंडले लांबवली. ही रक्कम सुमारे 15 लाखांच्या घरात असून, त्याने त्यातून लाख रुपये किमतीची दुचाकी, त्याच किमतीचा मोबाईल फोन खरेदी करत संपूर्ण कुटुंबास राहण्यासाठी दोन मजली घर बांधण्याचे ठरवले होते. दोन मजली माडीचे स्वप्न धुळीस मिळवत पोलिसांनी हकिमच्या मुसक्‍या आवळल्या.
जून्या कामगाराने दाखविले व्यापा-यास 'नवरंग'; पंधरा लाखांवर मारला डल्ला

साताऱ्याजवळील खेड परिसरात असणाऱ्या वनवासवाडीत साहिल हा कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. छोटेखानी घरात भाड्याने राहणाऱ्या हकिमचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. आई घरकाम तर वडील एका हॉटेलमध्ये काम करतात. कौटुंबिक उत्पन्न अल्प असल्याने दहावीपर्यंत शिकलेल्या हकिमने नवरंग दुकानात काम पत्करले. बोलबच्चनगिरीत पटाईत असणाऱ्या हकिमने नंतर दुकानात कामास असणाऱ्या सर्वांचा विश्‍वास मिळवला. दुकानात होणारी दररोजची उलाढाल हकिमच्या नजरेतून सुटली नाही. दररोजच्या उलाढालीतून जमा होणारी रक्कम कोठे ठेवण्यात येते, ती किती दिवसांनी बॅंकेत भरण्यात येते, दुकानमालकांची हिशोबपध्दती याची माहिती हकिमला झाली होती. यातूनच त्याच्या हाताला खाज सुटली व त्यातून त्याने हातसफाईला सुरवात केली.

अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ माहुलीत विद्युतदाहिनी उभारणार : अरुण गोडबोले  
 
दुकान बंद झाल्यानंतर वरच्या मजल्यावर असणाऱ्या होलसेल विभागाच्या खिडकीतून रात्री हकिम आत जाई आणि काउंटरमधील रोकड चोरत असे. हजार-दोन हजार करता करता हकिमने नंतर बंडले लांबविण्याचा सपाटा लावला. गेल्या महिन्यातील 25 ते 27 तारखेदरम्यानच्या विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी सव्वातीन लाख हकिमने याच पध्दतीने चोरले. विक्री आणि काउंटरमध्ये असणाऱ्या रकमेत तफावत आढळल्याने सुशांत नावंधर यांनी 28 रोजी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना पहाटे तीनच्या सुमारास वरच्या मजल्यावरील खिडकीतून एक जण आल्याचे व त्याने काउंटरमधील रोकड चोरल्याचे दिसले. दुकानात चोरी करणाऱ्याच्या हालचाली आणि देहबोली हकिमशी मिळतीजुळती असल्याचे चाणाक्ष नजरेच्या नावंधर यांनी ओळखले. रोकड चोरीस गेल्याच्या घटनेनंतर दोन दिवस हकिम कामावर आला नसल्याने नावंधर यांनी त्याचे घर गाठले. यावेळी हकिमने चोरी केल्याचे कबूल करत घरात असणारी रोकड काढून दिली. यानंतर नावंधर यांनी वर्षभराच्या खरेदी- विक्रीच्या नोंदी तपासल्या. यात त्यांना 15 लाख 30 हजारांची तफावत आढळल्याने नावंधर यांनी याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी यानुसार हकिमची उचलबांगडी केली. चौकशीत त्याने चोरलेल्या पैशातून एक लाखाच्या आसपास किमतीची दुचाकी, एक लाख रुपये किमतीचा आयफोन खरेदी केल्याचे सांगितले. हे सांगतानाच त्याने स्वत:साठी घर बांधण्याचे ठरवल्याचेही पोलिसांना सांगितले.

साक्षे.. साक्षे...! शिक्षणासाठी आत्महत्या केलेल्या साक्षीच्या आईचा हंबरडा व्यवस्थेला चपराक 


चोरलेल्या रकमेची जप्ती वेगात सुरू 

चोरलेल्या पैशांपैकी बरीच रक्कम हकिमने मित्रांना गरजेपोटी हातउसने दिल्याचेही पोलिसांना सांगितले. अडल्यानडलेल्या मित्रांना हकिम मागेल तेवढे पैसे उसने देत होता. त्यामुळे तो मित्रपरिवारात "साहिलशेठ' म्हणून प्रसिध्द झाला. तपासात समोर येणाऱ्या माहितीनुसार पोलिसांनी चोरलेल्या रकमेची जप्ती वेगात सुरू केलेली असून, हकिमचे कारनामे समोर आल्याने त्याच्या संपर्कातील अनेक जण हादरले आहेत.

शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचे बायोमायनिंग प्रकल्पाविरोधात आंदोलन

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT