सातारा

कांद्याने व्यावसायिकाच्या डाेळ्यात आणले पाणी; दहा लाखांना फटका

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : लोणंद मार्केट यार्डातून जामखंडी (जि. बागलपूर, कर्नाटक) येथील व्यापाऱ्यांकडे पाठवलेला मालट्रक चालकाने व्यापाऱ्यापर्यंत न पोचवता ट्रकमधील कांद्याची विक्री करून दहा लाखांचा अपहार केल्याची फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
 
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी विकास दत्तात्रय गिरी (वय 34) (रा. बोरी, ता. खंडाळा) यांनी गुरुवारी (ता. 11) सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास चालक बसवराज एम. खोत (पूर्ण पत्ता माहीत नाही) याच्या ताब्यातील मालट्रकमधून (क्रे. केए 22 डी 0729) सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या कांद्याच्या 20 हजार 860 किलोच्या 406 गोण्या भरून जामखंडी येथील व्यापाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. 

दरम्यान गुरुवारी पावणेआठ ते शनिवार  (ता. 13) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान लोणंद ते जामखंडी प्रवासादरम्यान या ट्रकचालकाने कांद्याचा ट्रक कर्नाटकातील व्यापाऱ्यांपर्यंत न पोचवता मधल्या मध्येच त्याची विक्री करून दहा लाखांचा अपहार केला. याबाबत कांद्याचे व्यापारी विकास दत्तात्रय गिरी (वय 34) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द फिर्याद नोंदवली. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी हे तपास करत आहेत. 

खटावात बेशिस्त पार्किंगचा व्यावसायिकांना अडसर; दुकानांपुढे ग्राहकांऐवजी वाहनांचीच गर्दी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ दोषमुक्‍त; ‘महाराष्‍ट्र सदन’प्रकरणी न्यायालयाचा निर्णय..

Uday Samant: दावोस येथे राज्याचा गुंतवणुकीचा विक्रम: उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, दौऱ्यात एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार!

Kolhapur Politics : काठावरचे बहुमत, ‘दे धक्का’ची धास्ती! महापालिकेतील महायुतीसमोर पाच वर्षांचे मोठे आव्हान

Latest Marathi news Live Update: कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील फ्लाय अॅश प्रकरणी महाजेनकोला मोठा दंड

दहावीला ९९ टक्के, नीट परीक्षेत कोकणात अव्वल; डॉक्टर व्हायचं होतं, पण २०व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

SCROLL FOR NEXT