सातारा

कऱ्हाड पोलिसांच्या मर्यादा स्पष्ट; खबऱ्यांचे जाळेही विस्कळित

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन महिन्यांत तस्करीला आलेले पाच रिव्हॉल्वर जप्त केले. त्या कारवाईने शहर, तालुका, तळबीड पोलिसांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. तस्करीसाठी येणाऱ्या रिव्हॉल्वरची माहिती पोलिसांना मिळू शकत नसल्याने त्यांच्या खबऱ्यांचे नेटवर्कही खिळखिळे झाले आहे. शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभाग तर केवळ नावालाच राहिलेला दिसतो. त्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा वचक कमी होत आहे. त्याच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यात शहर, तालुका, उंब्रज व तळबीड अशी चार पोलिस ठाणी आहेत. त्या शहर पोलिस ठाण्यातील गुन्हेगारीचे दर नेहमीच वाढता असतो. अलीकडच्या काळात तो कमी झाला होता. मात्र, पुन्हा एकदा पोलिसांचा वचक कमी होताना दिसतो. विशेष करून पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभाग कमजोर झाला आहे. या शाखेतील कर्मचाऱ्यांमध्येच तीन गट पडल्याचे दिसतात. कोण काय माहिती सांगतो, यापेक्षा साहेबांच्या मर्जीतील काही कर्मचाऱ्यांचे काम कमी असूनही ते अव्वल ठरल्याचे दिसतात. दुचाकी चोरीचे प्रकरण वगळता त्यांनी अन्य तपासात गुन्हे प्रकटीकरण विभागाची काहीच प्रगती नाही. तरीही तो विभाग सक्षम असल्याचे भासवले जाते. 

मध्यंतरी शिवडेतील दरोड्यातील संशयितांना सिनेस्टाइलने पकडण्यात आले. त्यातही गुन्हे प्रकटीकरण विभाग कुठे दिसला नाही. एलसीबीने ढेबेवाडी फाट्यावर दोन पिस्तुलांसह एकाला ताब्यात घेतले. त्यातही गुन्हे प्रकटीकरणाचा काहीच हातभार नव्हता. त्याशिवाय गावठी पिस्तूल जप्त झाली, तेथेही तपासात ते कमी पडले. त्यामागे गुन्हे प्रखटीकरण शाखेतील अंतर्गत वाद आहे. कर्मचाऱ्यांमध्ये एकमत नसल्याने व अंतर्गत वादाची लागण झाल्याने गुंडाविरोधी पथकाचे काम कमी दिसते. शहराबरोबर तालुका, तळबीड, उंब्रज पोलिसांच्या खबऱ्यांच्या कामावर मर्यादा झाल्या आहेत. दरोडेखोरांची टोळी असो, संशयितांना पकडणे असो अथवा तस्करीचे पिस्तूल असोत, त्या सगळ्या कारवाईत एलसीबी अधिक सक्षम दिसते. त्यांच्या खबऱ्यांचे जाळे सक्षम असल्याने कऱ्हाड पोलिसांच्या मर्यादा अधिक स्पष्ट झाल्या आहेत. 

"गुन्हे प्रकटीकरण'च्या पुनर्रचनेची गरज 
शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागात पोलिस कर्मचाऱ्यांत अंतर्गत वादाची लागण झाली आहे. त्याचा परिणाम सामुदायिक कामावर दिसतो. कोणत्याच तपासाचे काम तडीस जाताना दिसत नाही. परिणामी, त्यांच्यातील सांघिक भूमिकाही नाहीशी होताना दिसू लागली आहे. त्यावर पर्याय म्हणून वरिष्ठांना कऱ्हाड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पुनर्रचनेची गरज आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

SCROLL FOR NEXT