सातारा

प्रशासनाच्या नाकावर टिचून युवकांनी स्वखर्चातून बुजवले खड्डे!

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : येथील तरुणांनी गेली सहा महिने रस्त्यामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे स्वखर्चाने व श्रमदान करत भरून घेत एक आदर्श घालून दिला आहे. मेढा येथे जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावर असणाऱ्या रायगाव हायस्कूल ते सायगाव या दरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले होते. वाहन चालवतानाही वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. दररोज या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत होते. मात्र, तरीही बांधकाम विभाग सुस्त असल्याचे दिसत होते. 

गेली सहा महिने या खड्ड्यांच्या मार्गातूनच प्रवास करावा लागत होता. या सर्व गोष्टींचा विचार करत सायगावच्या युवकांनी एकत्र येत वर्गणी जमा करत या मार्गावरील खड्डे स्वखर्चाने मुरूम टाकून दिवसभर भरून घेतले. या मार्गावर गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्याची परवड झालेली असताना कोणताही अधिकारी, पदाधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसत असल्याने या युवकांनी खड्डे भरून घेत एक मोठा आदर्श या सर्वांना घालून दिला आहे. गेल्यावर्षीदेखील अशाच प्रकारे याच युवकांनी असेच खड्डे भरून घेतले होते. 

त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाचे काम दरवर्षी हे युवक करत आहेत. हे काम करताना जाणारे-येणारे प्रवासीदेखील त्यांच्या कामासाठी हातभार लावत त्यांचे कौतुक करत होते. त्यांनी भरून घेतलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनाचालक वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे. याकामी पुढाकार घेतलेल्या अशोक देशमुख, राहुल देशमाने, अजित साखरे, संतोष सावंत, संदीप देशमुख यांच्यासह युवकांचे येथील सरपंच अजित आपटे, तलाठी अमोल पाटील, ग्रामसेवक संदीप सावंत, रिक्षा संघटना, वाहनचालकांसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT