सातारा

सैदापुरातील सासवे कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू; अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज

हेमंत पवार

क-हाड : सैदापुर (ता कराड) येथे एकाच कुटुंबातील सख्या तीन बहिणींचा अकाली मृत्यू झाला आहे. कुटंबियासमवेत एकत्रित जेवण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा संबधीत तीन मुलींसह आईला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. यातील तीन मुलींना जास्त त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही मुलींना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिन्ही मुलींच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सासवे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आयुषी शिवानंद सासवे (वय तीन), आस्था शिवानंद सासवे (वय नऊ), आरुषी शिवानंद सासवे (वय आठ) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कुटुंब सैदापुर येथील मिल्ट्री होस्टेल नजीक वास्तव्यास आहे.

काबाडकष्टाने पिकवलेल्या पपईला मिळतोय कवडीमोलाचा भाव; सातारा जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः रडकुंडीला

दरम्यान मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT