सातारा

महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर अपघात! तीन शिक्षक गंभीर जखमी

सुर्यकांत पवार

तापोळा अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते एक महिना उलटून गेला तरी दुरूस्त झाले नाही.

कास (सातारा): महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने कार दरीत कोसळून अपघात झाला. यात तीन शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी वाई येथे हलविण्यात आले आहे.

तापोळा अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते एक महिना उलटून गेला तरी दुरूस्त झाले नाही. दुरुस्तीचे काम अर्धवट टाकून फक्त कामांवर कब्जा मिळवण्याची ठेकेदार यांची स्पर्धा सुरु आहे. मात्र सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

आज सकाळी खांबील गोल येथील शाळेकडे तापोळ महाबळेश्वर रोडवरुन निघालेल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या चार चाकी कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. कार खचलेल्या दरीत पलटी झाली. कारमधील वाळणे शाळेचे शिक्षक अंकुश टेबरे, आवळण शाळेचे विलास आवळे आणि वेंगळे शाळेचे राजेंद्र पिसाळ हे जखमी झाले असून जखमी शिक्षकांना तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरता उपचार करून पुढील उपचारासाठी वाई येथे हालविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत CNG महागला, महानगर गॅसने पुन्हा दरात केली वाढ; जाणून घ्या किती आहे दर?

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; सोनं ५ हजार तर चांदी ३० हजारांनी घसरली

Madhya Pradesh Foundation Day: मध्य प्रदेशचा ७१ वा स्थापना दिन; ‘वारशाचा गौरव, विकासाची नवी झेप’ हीच राज्याची नवी ओळख : मुख्यमंत्री

PAK vs SL Final: एका सामन्यात ६५६ धावा अन् १० विक्रमांचा धुरळा! भारताचा २४ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला; नेमकं काय घडलं?

Ujani Project: पुणे-सोलापूर मार्गावर ‘रास्ता रोको’; उजनी परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटरला विरोध

SCROLL FOR NEXT