Tommy Dog esakal
सातारा

इमानदार 'टॉमी'! मालक आजाराशी झुंजत असताना 'त्यानं' गाठलं थेट ICU; तीन दिवस उपाशी राहून घेतली भेट

टॉमी नावाच्या कुत्र्यानं मालक आजारी पडल्यानं दाखल झालेल्या हॉस्पिटलच्या आयसीयूकडं धाव घेतली.

अंकुश चव्हाण

मालकासाठी एखादा प्रामाणिक कुत्रा तीन दिवस उपाशी राहिल्याचे आश्‍चर्य वाटले.

कलेढोण : मुकी जनावरं आणि माणसाचं नातं अतुट आहे. घरातील मांजर, कुत्रा, गाय, बैल, शेळ्या आदी पाळीव प्राण्यांना माणसं जीव लावतात. तेवढाच जीव प्राणी सुद्धा लावतात. यातील कुत्रा (Tommy Dog) हा प्रामाणिक इमानदार म्हणून ओळखला जातो. मालक आणि त्याच्यातील नातं हे किती घट्ट असतात. याची अनेक उदाहरणं आपल्या सभोवताली दिसतात.

अशाच एका टॉमी नावाच्या कुत्र्यानं मालक आजारी पडल्यानं दाखल झालेल्या हॉस्पिटलच्या आयसीयूकडं धाव घेतली. तीन दिवस उपाशी राहिल्यानंतर टॉमीनं आपल्या मालकाच्या हस्ते बिस्किटं खाऊन आपले मौन सोडले. मायणी कचरेवाडीतील प्रकाश पांडुरंग कदम यांच्या छातीत वेदना होत असल्याने मायणीतील श्रेयस हॉस्पिटलमध्ये (Shreyas Hospital) दाखल केले.

उपचारानंतर त्यांची तब्येत स्थिरावण्यास तीन-चार दिवस गेले. मात्र, घरात आपला मालक दिसत नाही म्हटल्यावर टॉमीही बैचेन झाला. त्यानं नातेवाईकाच्या पाठीमागे जावून चांदणी चौकातील हॉस्पिटल गाठलं. आपले नातेवाईक इथे दिसत असले तरी मालक दिसेनात म्हणून तो हॉस्पिटलच्या बाहेर टॉमी तीन दिवस अन्नपाणी सोडून पडून राहिला. ही गोष्ट हॉस्पिटलचे डॉ. शशिकांत कुंभार, सूर्यकांत कुंभार व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. कर्मचाऱ्यांनी व नातेवाईकांनी टॉमीला चपाती-भाकरी खायला दिली. मात्र, टॉमीने त्यास तोंड लावले नाही.

शेवटी कदम यांच्या नातेवाईकांनी डॉ. कुंभार यांच्याकडं कदम यांना पाच-दहा मिनिटे आयसीयूतून बाहेर सोडण्याची विनंती केली. माणुसकीच्या या नात्यासाठी डॉक्टरांनी कदमांना बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली. आपला मालक बाहेर येताच टॉमीनं शेपूट हलवीत मालकाच्या अंगावर झेपा घेण्यास सुरुवात केली. विविध आवाज काढीत टॉमी खूष झाला.

कदम यांनी टॉमीला घरी जाण्यास सांगितलं. मात्र, तो जागचा हलला नाही. त्यानंतर तीन दिवस काही न खालेल्या टॉमीला मालकाने बिस्किटे देवू केली. टॉमीने ते आनंदाने खाल्ली. आधुनिक युगात माणसांना माणसे विचारात नाही. मात्र, टॉमी या कुत्र्याचे मालकाप्रती प्रेम पाहून हॉस्पिटलमधील कर्मचारी, नातेवाईक व उपस्थित सर्वजण भारावून गेले. याचवेळी सुप्रसिद्ध कलाकार कै. दादा कोंडके यांनी ‘वाघ्या’ या कुत्र्यावरील चित्रीत केलेल्या गाण्यातील ‘नाही मिळालं पोटाला तरी, धन्यासाठी तू मरतुया’ हे वाक्य आपणास नक्की आठविल्याशिवाय राहत नाही.

Tommy Dog

मालकासाठी एखादा प्रामाणिक कुत्रा तीन दिवस उपाशी राहिल्याचे आश्‍चर्य वाटले. मुके प्राणी व माणूस यांच्यातील प्रेम, जिव्हाळ्याची अनेक उदाहरणे आहेत. आमच्या हॉस्पिटलमधील ही भावूक व बोलकी आहे.

-डॉ. सूर्यकांत कुंभार, मायणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT