police Sakal Media
सातारा

साता-यात पाेलिसांची अरेतुरेची भाषा; व्यापा-यांना अटकेची धमकी?

अत्यावश्‍यक सेवा कायद्याचा भंग झाल्यास त्याची जबाबदारी पतंगे यांच्यावर राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

गिरीश चव्हाण

अत्यावश्‍यक सेवा कायद्याचा भंग झाल्यास त्याची जबाबदारी पतंगे यांच्यावर राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सातारा : सर्व नियमांचे पालन करून खते, बी- बियाण्यांची fertilizers विक्री करण्यात येत असतानाही शाहूपुरी पोलिस ठाण्याचे shahupuri police station पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्याकडून नाहक त्रास, दमदाटी होत असल्याची तक्रार साताऱ्यातील म्हसवडकर एजन्सीजचे शशांक शहा, पारस शहा यांनी निवेदनाद्वारे केली आहे. traders-complaints-against-police-satara-marathi-news-shambhuraj-desai

या निवेदनाच्या प्रती त्यांनी ग्रामीण गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिल्या आहेत. निवेदनात शहा यांनी म्हटले आहे, की खरीप हंगाम सुरू होणार असल्याने शासनाच्या नियमानुसार खते, बी- बियाणे यांची विक्री आम्ही सकाळी सात ते अकरा या वेळेत करत आहोत. यानंतर शेतीविषयक साहित्य आम्ही घरपोच देण्याचे काम कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू आहे. असे असतानाही शनिवारी (ता. 22) सकाळी शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे हे दुकानाजवळ आले. त्यांनी अरेतुरेची भाषा वापरत अटकेची धमकी दिली. याचबरोबर सुरक्षारक्षक, तसेच दुकानाजवळ असणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. अशा पद्धतीने वागणूक मिळणार असेल, तर बी- बियाणे व इतर वस्तूंची विक्री आम्हाला नाईलाजाने थांबवावी लागेल. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा कायद्याचा भंग झाल्यास त्याची जबाबदारी पतंगे यांच्यावर राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

याच निवेदनात त्यांनी कोणतेही सबळ कारण नसताना यापूर्वी पोलिसांनी जबरदस्तीने पोलिस ठाण्यात पकडून नेल्याचे शशांक शहा यांनी निवेदनात नमूद केले आहे. परगावाहून येणाऱ्या कामगार, शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची समज संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंतीही शहा यांनी निवेदनात केली आहे.

विनाकारण कारवाई

अंधारी येथील संस्थेस दान देण्यासाठीचे फर्निचर दाखवत असताना आमच्यावर पोलिसांकडून विनाकारण कारवाई करत दंड वसूल करण्यात आल्याची तक्रार साताऱ्यातील व्यापारी गोपाळ शेठ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. स्वत:चा जीव धोक्‍यात घालून समाजसेवा करत असताना असा प्रकार होणे हे धक्कादायक असल्योही श्री. शेठ यांनी निवेदनात नमूद केले आहे.

traders-complaints-against-police-satara-marathi-news-shambhuraj-desai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT