Plane Crashed on karad airport sakal
सातारा

Plane Crashed : विमातनळावर प्रशिक्षणाचे विमान कोसळले; प्रशिक्षणार्थी पायलट जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

कऱ्हाड (जि. सातारा) येथील विमानतळावर वैमानिकाचे प्रशिक्षण सुरु असताना ते लॅण्डींग करताना ट्रेनींग सेंटरचे विमान कोसळून अपघात झाला.

हेमंत पवार

कऱ्हाड - कऱ्हाड (जि. सातारा) येथील विमानतळावर वैमानिकाचे प्रशिक्षण सुरु असताना ते लॅण्डींग करताना ट्रेनींग सेंटरचे विमान कोसळून अपघात झाला आहे. विमान धावपट्टीवर उतरताना अचानक वेग वाढल्याने विमानतळाच्या दक्षिणेकडील भिंतीच्या अलिकडे जावुन ते कोसळले. त्यात प्रशिक्षणार्थी जखमी झाला आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

कऱ्हाड येथील विमानतळावर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या ॲम्बिसिअन्स फ्लाईंग क्लबने वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. तेथे दररोज प्रशिक्षणार्थी वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत आज एका प्रशिक्षणार्थी वैमानिकाकडुन विमान उतरताना अचानक विमानाचा वेग वाढला. त्यामुळे ते संबंधित पायलटचा नियंत्रीत करता आले नाही.

त्यामुळे ते जावुन विमानतळावरील दक्षिण बाजुच्या धावपट्टीजवळील संरक्षक भिंतीजवळ कोसळले. त्यानंतर ते पलटीही झाले. त्यामुळे त्या अपघातात प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे. दरम्यान अपघातानंतर संबंधित अपघातग्रस्त विमान हे विमान पार्किंगच्या परिसरात नेण्यात आले. विमान आणखी वर उडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने मोठा अनर्थ टळल्याचे तेथील लोकांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT