Satara Latur highway at Gondawale Three died on the spot 
सातारा

गोंदवले येथे सातारा-लातूर महामार्गावर तिहेरी अपघात

तिघे जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

फिरोज तांबोळी

गोंदवले - सातारा-लातूर महामार्गावर गोंदवले खुर्द जवळ आज दुपारी दीडच्या सुमारास समोरासमोर झालेल्या तिहेरी अपघातात तिघे तरुण जागेवरच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की चक्काचूर झालेली अपघातग्रस्त वाहने सुमारे तीनशे फूट अंतरापर्यंत फरपटत गेली. या अपघातात सुदैवाने पाच वर्षांच्या मुलाला कसलीही इजा झाली नाही. सर्व मृत पळशी (ता. माण) येथील असल्याने पळशी गावावर शोककळा पसरली.

सातारा लातूर महामार्गाचे काम पूर्ण होत असताना गोंदवले खुर्द परिसरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.आज दुपारी दीडच्या सुमारास स्विप्ट कार (एम एच. ०५ व्ही ९६९५) व बुलेट यांचा समोरासमोर अपघात झाला. या धडकेत बुलेटस्वार उंच हवेत फेकले गेले. याच दरम्यान रस्त्याने चाललेल्या क्रूझर (एम एच १३ ए सी १७४९) वर एक जण जाऊन आदळला व त्यानंतर रस्त्यावर फेकला गेल्याने जागेवर मृत झाला. इतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात तुषार लक्ष्मण खाडे (वय 22 ),अजित विजयकुमार खाडे (वय 23), महेंद्र शंकर गौड (वय 21) सर्व रा. पळशी, ता. माण हे जागीच ठार झाले.

या अपघातात बुलेटचा अक्षरशः चक्काचूर झाला. स्विप्ट कारचेही मोठे नुकसान झाले. दोन्हीही वाहने सुमारे तीनशे फूट फरफटत गेल्याने रस्त्यावर वाहनांचे भाग विस्कटून पडले होते. स्विप्ट कार मधील निवृत्त पोलीस आनंदराव ढेंबरे (वय ६२) मुलगा गणेश ढेंबरे (वय २८) व विहान गणेश ढेंबरे (वय ५) सर्व रा. दीडवाघवाडी, ता. माण हे पिंपरी (पुणे) येथून गावी निघाले होते. या अपघातात आनंदराव व गणेश हे गंभीर जखमी झाले. तर या अपघातातून विहान आश्चर्यकारक बचावला. जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर दहिवडी पोलिस मात्र सुमारे तास उलटूनही घटनास्थळी न आल्याने लोक संतप्त झाले होते.

दरम्यान याच परिसरात गेल्या काही महिन्यात झालेला हा सहावा भीषण अपघात आहे.प्रशस्त रस्ता,तीव्र उतार यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे या परिसरात वेग प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे पुन्हा केले कौतुक, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याचे दिले संकेत

"एवढा खर्च तुम्हाला दाखवण्यासाठी केला, की..."; इंदुरीकर महाराजांचं अजब उत्तर, लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून झाली होती टीका

Mahavikas Aghadi Decision: सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका एकत्र लढविणार; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय; नेमकं बैठकीत काय घडलं?

CAT 2025 Exam: CAT 2025 परीक्षा 30 नोव्हेंबरला; निकाल जानेवारी 2026 मध्ये जाहीर होणार

मोठी बातमी! दुबार-तिबार मतदारांना नगरपरिषदेनंतर झेडपी, महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तेथेसुद्धा करता येणार मतदान; काय आहे नेमका नियम? वाचा...

SCROLL FOR NEXT