सातारा

ग्रामस्थांचे प्रसंगावधान, ट्रक पलटी होताच चालकाचे वाचवले प्राण!

अशोक सस्ते

आसू (जि. सातारा) : फलटण पूर्व भागातील आसू, राजाळे, बरड परिसरात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गोखळी येथील ओढ्याला पूर आला. या पुलावरून पाणी वाहत असताना गॅस सिलिंडरच्या टाक्‍या घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून ट्रकचालकाला सुखरूप बाहेर काढले. पुरामुळे ओढ्याकाठची पिके, घरे, दुकानांचे नुकसान झाले. 

फलटण पूर्व भागातील आसू, बरड, राजाळे या महसुली मंडलात, तर निंबळक 82 मिलिमीटर पाऊस झाल्याने पूर्व भागातील अनेक ओढ्यांना पूर आले. रात्रीपासून फलटण-पंढरपूर व फलटण-आसू रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद होती. शिंदेनगर-शिंदेवाडी येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. गोखळी येथील ओढ्यालाही मोठा पूर आला. पुलावर तीन ते चार फूट उंचावरून पाणी वाहत असल्याने फलटण, बारामतीकडे जाणारी वाहतूक आज दुपारी दोनपर्यंत ठप्प होती. 

पुरामुळे ओढ्याकाठच्या पिकांचे नुकसान झाले, तसेच काहींच्या दुकानात व घरामध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले. दरम्यान, आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने वाहत्या पाण्यात ट्रक घातल्याने तो पलटी झाला. येथील ग्रामस्थांनी चालक श्री. संकपाळ यांना सुखरूप बाहेर काढले. ट्रकमध्ये असलेल्या सिलिंडर टाक्‍या साखळीने एकमेकांना बांधल्या असल्याने मोठा अनर्थ टळला. दर वर्षीच्या पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT