Baby esakal
सातारा

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाळ चोरून नेण्याचा प्रकार

विलास खबाले

चोरीचा प्रकार आईच्या लक्षात आल्याने तिने बाळाला ताब्यात घेतले. या वेळी चोरटा आणि तिच्यात झटापट झाली.

विंग (सातारा) : चॅाकलेट (Chocolate) देण्याच्या बहाण्याने बाळाला (Baby) चोरून नेणाऱ्या चोरट्याचा बेत येथे फसला. बाळाच्या आईनेच प्रसंगावधान दाखवून चोरट्याला पकडून त्याची धुलाई केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. चोरट्याने तेथून लगेच पोबारा केला. काल दुपारी घडलेल्या घटनेने त्या परिसरातील ग्रामस्थांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील सिद्धेश्वर वॉर्ड परिसरात काल दुपारी तीन वर्षांचा चिमुकला त्याच्याच घराबाहेर खेळत होता. दुपारची वेळ असल्याने रस्ताही सामसूम होता. घराबाहेर कोणीच नव्हते. बाळाची आई घरातील कामात व्यस्त होती. दरम्यान तिथे आलेल्या एका चोरट्याने घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकल्याला चॅाकलेट देण्याचा बहाणा केला आणि त्याला उचलून कडेवर घेतले. त्याला घेऊन काही अंतर पुढे तो चालत गेला. आईच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने तिने त्या चोरट्याचा पाठलाग केला. त्याची विचारपूस केली. त्याने नातेवाईक असल्याचा बतावणी केली.

उडवाउडवीची उत्तरे आल्याने चोरीचा प्रकार आईच्या लक्षात आल्याने तिने बाळाला ताब्यात घेतले. या वेळी चोरटा आणि तिच्यात झटापट झाली. महिलेने त्याला चांगलाच चोप दिला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. चोरट्याने मात्र, स्वतःची सुटका करून तेथून दुचाकीवरून पोबारा केला. चोप देतेवेळी बाळ घाबरले. घडलेली घटना इतरांना सांगताना ती महिला अक्षरशः घाबरून गेली होती. या घटनेने त्या परिसरातील ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

खेळण्याच्या आवाजाने झाला उलगडा

हातातील खेळण्यांमुळे चोरीचा खरा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने बाळाला उचलतेवेळी खेळणे खाली पडताना झालेल्या आवाजाने आईचे लक्ष तिकडे गेले. बाळ पडले की काय, म्हणून तिने तिकडे पाहिले. त्या वेळी चोरट्याने त्याला उचलून घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर महिलेने संबंधितांकडून बाळाला घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT