Covid19 
सातारा

साता-यात 21 काेविड बाधितांचा मृत्यू; पालकमंत्री चिंतेत

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात साेमवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 780 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच 21 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (twenty-one-covid19-patients-died-satara-news)

दरम्यान सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतेच केले आहे.

सातारा जिल्ह्यात काेविड 19 रुग्णांमध्ये पुन्हा वाढ हाेऊ लागली आहे. गत 24 तासांत 780 नागरिकांना काेविड 19 ची बाधा झाली आहे. सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 37 (8542), कराड 286 (27503), खंडाळा 18 (11757), खटाव 51 (19508), कोरेगांव 61(16751), माण 29(13159), महाबळेश्वर 3(4278), पाटण 39(8432), फलटण 32 (28351), सातारा 167 (40308), वाई 44 (12649) व इतर 13 (1325) असे आज अखेर एकूण 192563 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (192), कराड 7(808), खंडाळा 0 (149), खटाव 2 (486), कोरेगांव 1 (383), माण 0(260), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (197), फलटण 2 (282), सातारा 6 (1231), वाई 2(333) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4366 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1085 रुग्णांना साेमवारी उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

काेविड 19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री श्री. पाटील यांनी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा. बाजार पेठांबरोबर सार्वजनिक ठिकाणी विना मास्क कोणी दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा अशा सक्त सूचना अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT