truck sakal
सातारा

सातारा : ट्रक फसवणूकप्रकरणी साताऱ्यात दोघांना अटक

ट्रक खरेदीसाठी काढलेले कर्ज फेडण्‍याच्‍या कराराचे पालन न करता ट्रकची परस्‍पर विक्री

सकाळ वृत्तसेवा

सातारा : ट्रक खरेदीसाठी काढलेले कर्ज फेडण्‍याच्‍या कराराचे पालन न करता ट्रकची परस्‍पर विक्री केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्‍या पथकाने उन्मेष उल्‍हास शिर्के (रा. नीरा, ता. पुरंदर) आणि अब्‍दुलकादीर मोहम्‍मद कादीर (रा. सुपा, ता. पारनेर) या दोघांना अटक केली. अटकेतील दोघांनी अनेकांची फसवणूक केल्‍याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी एकंबे (ता. कोरेगाव) येथील सचिन बजरंग चव्‍हाण यांनी तक्रार नोंदवली होती.

एकंबे (ता. कोरेगाव) येथे सचिन चव्‍हाण हे राहण्‍यास आहेत. त्‍यांनी सातारा येथील एका फायनान्‍स कंपनीकडून कर्ज घेत ट्रक घेतला होता. काही कारणास्‍तव चव्‍हाण यांनी तो ट्रक फायनान्‍स कंपनीतील एकाच्‍या ओळखीने नीरा येथील शिर्के याला दिला. या वेळी ट्रक खरेदीसाठी काढलेल्‍या कर्जाचे उर्वरित हप्‍ते भरण्‍याचा करार शिर्के व चव्‍हाण यांच्‍यात झाला. त्यानुसार शिर्के यांनी कर्जाचे हप्‍ते भरणे आवश्‍‍यक होते. मात्र, ते भरणे त्‍यांनी टाळले. याबाबत संपर्क साधला असता चव्‍हाण यांना प्रत्‍येकवेळी उडवाउडवीची उत्तरे शिर्के देत होते. त्यानंतर चव्‍हाण यांनी शिर्केकडे ट्रक परत मागितला, मात्र तो देण्‍यास त्‍याने नकार दिला. याच काळात शिर्केने त्‍या ट्रकची परस्‍परविक्री केली.

फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर चव्‍हाण यांनी याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार पोलिस उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी शिर्के व कादीर या दोघांना आज ताब्‍यात घेतले. चौकशीत त्‍यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अटकेतील दोघांनी साताऱ्यासह पुणे, मुंबई, सोलापूर, नगर, गुजरात येथील अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्‍याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

SCROLL FOR NEXT