Car and Truck Accident
Car and Truck Accident Sakal
सातारा

अपघातात कळसकरवाडीच्या २ भावांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

दहिवडी - नव्या कोऱ्या चारचाकीने उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या भीषण अपघातात कळसकरवाडी (ता. माण) येथील दोन चुलत भाऊ ठार झाले, तर आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबतची माहिती अशी, कळसकरवाडी येथील आनंदराव शिवराम पवार (वय ६८) यांचा मुलगा स्वप्नील याने १५ दिवसांपूर्वी नवीन चारचाकी गाडी घेतली होती. या गाडीचे सोमवारी कळसकरवाडी येथे पूजन केल्यानंतर आनंदराव पवार हे मुलगा स्वप्निल तसेच पत्नी उषा पवार व चुलतभाऊ माणिक साहेबराव पवार (वय ५८) यांच्यासोबत देवदर्शनासाठी गेले होते. तुळजापूरला भवानीमातेचे व पंढरपूरला विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर आज हे सर्व जण जोतिबाच्या दर्शनाला वाडी रत्नागिरीला निघाले होते.

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते. मिरजच्या दिशेने जाताना नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथून काही अंतरावर गणेश पेट्रोल पंपासमोर गाडी आली असता चालक स्वप्नील पवार याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने मालवाहतूक करणाऱ्या जागेवर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत डाव्या बाजूला बसलेले आनंदराव पवार हे जागीच ठार झाले, तर त्यांच्या पाठीमागे असलेल्या माणिक पवार यांना उपचारासाठी नेताना त्यांचा मृत्यू झाला. उषा पवार व स्वप्नील पवार हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कळसकरवाडी व कुळकजाई ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. पवार बंधूंच्या अपघाती मृत्यूमुळे कुळकजाई परिसरावर शोककळा पसरली आहे.

पवार कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले

आनंदराव पवार हे कुळकजाई विकास सोसायटीचे माजी अध्‍यक्ष असून, माणच्या पश्चिम भागात विशेषतः कुळकजाई भागात त्यांचे मोठे राजकीय वलय होते. त्यांनी १९९२ तर त्यांच्या पत्नीने १९९७ रोजी पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक लढवली होती. आमदार जयकुमार गोरे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. स्वप्नील पवार हा फर्ग्युसन ट्रॅक्टर कंपनीत पुणे येथे नोकरीला असून, लवकरच त्याचा साखरपुडा होणार होता. मात्र, आजच्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT