सातारा

दाेन जीवलग मैत्रिणी खेळत हाेत्या भातुकलीचा खेळ; तेवढ्यात गांधील माशांनी केला जीवघेणा हल्ला आणि सर्व संपलं

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : घराच्या गच्चीवर खेळताना गांधील माशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 27) सायंकाळी महिंद (ता. पाटण) येथील बौद्धवस्तीत घडली. अनुष्का दिनेश यादव (वय 12) आणि सेजल अशोक यादव (वय 8) अशी मृत मुलींची नावे आहेत. या घटनेत आणखी पाच जण जखमी झाले आहेत.
 
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार महिंद येथील बौद्ध वस्तीतील तुकाराम ज्ञानू यादव यांच्या घराच्या गच्चीवर अनुष्का, सेजल व आणखी एक लहान मुलगा असे तिघे जण खेळत होते. त्या वेळी घराच्या पाठीमागे असलेल्या झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारणाऱ्या वानरांच्या कळपाचा लगतच्याच पडक्‍या घरात असलेल्या गांधील माशांच्या घराला धक्का लागल्याने माशा चवताळल्या आणि गच्चीवर खेळणाऱ्या मुलांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी गच्चीवर धावलेल्या यादव कुटुंबीयातील काही जणांनाही माशांनी चावा घेत जखमी केले. अचानकपणे घडलेल्या या प्रकाराने वस्तीवर एकच धावपळ उडाली. नागरिकांनी धाडसाने पुढे येत माशांच्या तावडीत सापडलेल्यांची सुटका केली. अनेकांच्या घरात गांधील माशा शिरल्याने घबराटीचे वातावरण पसरले होते.

कपड्यांचे ढीग चिखलात : माणुसकीच्या भिंतीला हवंय हक्‍काचं छत; महापालिकेच्या उपक्रमाची कोरोनामुळे वाताहत

येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना हॉस्पिटल सुरू केल्याने तेथे नियमित रुग्णांना उपचार बंद आहेत. त्यामुळे गंभीर जखमी अनुष्का, सेजल व अन्य लोकांना रात्री उपचारासाठी तळमावले येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यापैकी अनुष्काचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर घरी आणल्यावर सेजलचीही प्रकृती गंभीर बनली. उपचारासाठी तिला पुन्हा दवाखान्यात नेताना रात्री एकच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला.

अनुष्का ही पाचवीत शिकत होती. येळगाव (ता. कऱ्हाड) हे तिचे मूळ गाव असून, काही दिवसांपूर्वीच ती आजोळी महिंदला आली होती. तिच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. सेजल ही दुसरीत शिकत होती. तिच्या मागे आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

जयंतरावांचे कही पे निगाहे, कही पे निशाणा 

जिवलग मैत्रिणींची चटका लावणारी "एक्‍झिट' 

सेजल व अनुष्कावर मंगळवारी महिंद येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साेमवारी सायंकाळपर्यंत एकमेकींच्या खांद्यावर हात ठेऊन वस्तीतून बागडणाऱ्या चिमुकल्या मैत्रिणींचे जाणे तेथील अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. दोघींचे मृतदेह आणि कुटुंबीयांचा आक्रोश बघून उपस्थितांच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या.

काय सांगता! देशी वांग्याचा दर वाढताेयच

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

Virar News : आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर यांचे निधन

CM Devendra Fadnavis : सहकार्याची नवी दारे होणार खुली; महाराष्ट्र-अमेरिकेतील आयोवा राज्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

Nashik News : शिवसेना (ठाकरे)-मनसेचा जनआक्रोश; नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र मोर्चा

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

SCROLL FOR NEXT