accident 
सातारा

वडगाव हवेलीत दोन अपघातांत दोन ठार

वडगाव हवेली येथे काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला

सकाळ वृत्तसेवा

रेठरे बुद्रुक - कऱ्हाड- तासगाव रस्त्यावर काही मिनिटांच्या फरकाने झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले. वडगाव हवेली येथे काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अन्य एक गंभीर जखमी आहे. दिलीप भीमराव जगताप (वय ५८, रा. वडगाव हवेली) व आकाश लोंढे (वय ३५, रा. गोळेश्वर) अशी मृतांची नावे आहेत. सुनील गोतपागर हे जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांसह घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दिलीप जगताप हे त्यांचे सहकारी सुनील गोतपागर दोघे दुचाकीवरून शेणोली स्टेशनहून वडगाव हवेलीला निघाले होते. काम आटोपून घरी जाताना वडगाव हवेलीच्या फाट्याजवळ अपघात झाला. कऱ्हाडच्या दिशेने आलेल्या चारचाकी कारने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की अपघातात जगताप यांचा मृत्यू झाला. त्यांचा एक पाय तुटून बाजूला झाला होता. त्यांना व जखमी गोतपागर यांना कऱ्हाड येथे उपचारासाठी नेताना वाटेत जगताप यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर कारमधील एअर बॅग उघडले. कारही जागीच हेलापाटून थांबली. अपघातातील चारचाकी वाहन रस्ता ओलांडून बाहेर गेलेल्या ठिकाणावरून बाहेर काढण्यासाठी क्रेन आणली होती. सुमारे तासाभराने कऱ्हाडकडून आकाश लोंढे हे शेणोलीकडे निघाले होते. त्या वेळी त्यांना अंधारात क्रेन दिसली नाही. त्यामुळे तेही भरधाव येत त्या क्रेनवर आदळले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने व दुचाकीसह आदळल्याने लोंढे जागीच ठार झाले. तासाभराच्या अंतराने दोन अपघात झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT