Two killed in two-wheeler accident satara police vehicle fall in stream satara
Two killed in two-wheeler accident satara police vehicle fall in stream satara esakal
सातारा

भुईंज : दुचाकी अपघातात दोन ठार; पुलावरून गाडी कोसळली ओढ्यात

विलास साळुंखे

भुईंज : सुरुर येथे दुचाकी अपघातात दोनजण ठार झाले आहेत. पुलावरून गाडीसह दोघेही वाहत्या ओढ्यात कोसळले. या बाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान पुण्यावरून सातारा कडे जाणारी दुचाकी क्रमांक MH11 Z 5910 ही सुरुर कवठे या गावांच्या दरम्यान महामार्गावरील बांमनकीचा ओढ्यावरील पुलावरून डिव्हायडर तोडून दुचाकी वाहत्या पाण्यात कोसळली व या दुर्घटनेत दोनजन मृत्युमुखी झाल्याची माहिती घटनास्थळावरून देण्यात आली रात्री उशिरापर्यंत मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू होते.

अपघातात मृत झालेले दोनजण बावधन तालुका वाई येथील असून प्रकाश निवृत्ती भोसले वय 32 व बाळासाहेब महादू शिंदे वय 45 अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येथे नेण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी सुरुर ग्रामस्थांनी मदतकार्य देत भुईंज पोलिसांना बोलवले सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे,पी एस आय रत्नदीप भांडारे,हवालदार शिवाजी तोडरल,हवालदार बापूसाहेब धायगुडे,चंद्रकांत मुंगसे,पोलीस पाटील आदी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT