Suicide
Suicide sakal
सातारा

नववीतील दोन मुलींची गळफास घेवून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

मलकापूरातील लक्ष्मी कॉलनीतील शाळकरी मुलीने, तसेच साताऱ्यातील धुमाळ आळी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थीनीने आज गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.

सातारा/मलकापूर - मलकापूरातील बैल बाजार रोडलगत असणाऱ्या लक्ष्मी कॉलनीतील शाळकरी मुलीने, (School Girl) तसेच सातारा साताऱ्यातील धुमाळ आळी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थीनीने (Students) आज दुपारी राहत्‍या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या (Suicide) केली. या दोघीही इयत्ता नववीत शिकत होत्या. दोघींच्याही आत्महत्तेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पायल राजू लोंढे (वय १४) व अनुष्‍का संदीप पवार (वय १५) अशी मृतांची नावे आहेत.

मलकापूरातील बैल बाजार रोडलगत असणाऱ्या लक्ष्मी कॉलनीतील नववीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड मार्केट यार्ड-नांदलापुर रस्त्यालगत लक्ष्मी कॉलनीत राजू लोंढे हे अनेक वर्षापासून भाडेतत्वावर घेतलेल्या घरात राहत आहेत. या घरामध्ये पायल, तिचे आई-वडील व लहान भाऊ असा परिवार रहात होता. या घराशेजारी आजी-आजोबाही राहतात.

आज तिची आई जवळच असणाऱ्या मंगल कार्यालायत लग्नासाठी गेल्या होत्या. वडील कामासाठी गेले होते. सकाळी साडेबाराच्या सुमारास आज्जी घरी आला असता पायलने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आज्जीने आरडाओरडा केल्याने शेजारील लोक जमा झाले. आजोबांनी दोर कापून तिला खाली घेतले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. चोरगे यांनी भेट देऊन पाहणी केली. हवालदार विजय मुळे तपास करत आहेत. पायलच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही.

घरात एकटी असताना केले कृत्य

सातारा : सातारा येथील धुमाळ आळी परिसरात राहणाऱ्या शाळकरी विद्यार्थीनीने आज दुपारी राहत्‍या घरी गळफास घेवून आत्‍महत्‍या केली. त्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात झाली आहे. धुमाळ आळी परिसरात अनुष्‍का संदीप पवार (वय १५) ही कुटुंबियांसमवेत राहण्‍यास होती. ती शहरातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकण्‍यास होती. आज दुपारी घरात एकटी असताना तीने राहत्‍या गळफास घेवून आत्‍महत्‍या केली. तीने आत्‍महत्‍या केल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. आत्‍महत्तेचे कारण समजू शकले नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्‍यातील हवालदार महेश कदम तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT