Crime News esakal
सातारा

सातारा : नागठाणे परिसरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : परिसरातील सासपडे व पाडळी (निनाम, ता. सातारा) येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांकडून (Nagthane Police) मिळालेल्या माहितीनुसार, सासपडे येथील सतीश पोपट कांबळे (वय ४०) यांनी आज दुपारी आत्महत्या केली.

नागठाणे परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ते नातेवाईंकाच्या घराशेजारीच एकटेच राहत होते. त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे व घरगुती कारणामुळे त्यांची पत्नी व मुलगी माहेरीच राहत होते. दुपारी अडीचच्या दरम्यान सतीश हे जेवण घेण्यासाठी न आल्यामुळे नातेवाईक त्यांच्या घरी पाहण्यासाठी गेले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता घराच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने सतीश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. योगेश अवघडे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात खबर दिली. हवालदार राजू शिखरे तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत पाडळी (निनाम) येथील नितीन आनंदराव शिंदे (वय ३७) या युवकाने लग्न होत नसल्यामुळे दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीनने आज सकाळी गावालगत असलेल्या शेतीफार्म शिवारात असलेल्या लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. उत्तम विभूते (रा. नागठाणे) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात खबर दिली. सहायक फौजदार रामचंद्र फरांदे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT