सातारा

'अफाट बुद्धीमुळेच मागच्‍या दाराने उदयनराजेंवर राज्‍यसभेत'

शिवेंद्रसिंहराजेंची टीका; त्‍यांच्‍या बुद्धीशी आमची तुलना अशक्य

सकाळ वृत्तसेवा

सातारा : ‘ते’ मोठे असल्‍याने त्‍यांची बुद्धी मोठी असेल. मी लहान असल्‍याने माझी बुद्धी लहान असेल. मी ते मान्‍य करतो. खासदारसाहेबांची बुद्धी अचाट आणि अफाट आहे. त्‍यांच्‍या बुद्धीशी आमची तुलना होऊ शकत नाही. या अफाट बुद्धीमुळेच लोकांतून निवडून आलेली लोकसभा घालवून मागच्‍या दाराने ते राज्‍यसभेत जाऊन बसल्‍याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्‍यावर आज केली. आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कास येथील विविध विकासकामांच्‍या उद्‌घाटनावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘आमच्‍या नेतृत्वाखालील दोन्‍ही बँकांचे रिझर्व्‍ह बँकेच्‍या सूचनेनुसार योग्‍य पद्धतीने विलीनीकरण झाले असून, कोणाचा एक रुपयाही बुडला नाही. या बँकांचे विलीनीकरण होऊ नये, यासाठी त्‍यांनी त्‍या वेळी फार प्रयत्‍न केले होते. मी कोणाचेही घर फोडले नाही किंवा तसा घरफोडीचा कोणताही गुन्‍हा माझ्‍यावर नोंद नाही. त्‍यांची बुद्धी खरच अफाट आणि अचाट आहे. ही बुद्धी त्‍यांनी साताऱ्यातील रखडलेले प्रकल्‍प मार्गी लावण्‍यासाठी वापरली पाहिजे पण तसे होताना दिसत नाही. खासदार आपली बुद्धी प्रकल्‍पातील पैसा काढण्‍यासाठी वापरत आहेत.’’

लोकांतून निवडून आलेल्‍या लोकसभेचा राजीनामा देत ते भाजपत गेले. ते कशासाठी गेले हे त्‍यांना अजूनही समजले आहे का, असा प्रश्‍‍न उपस्‍थित करत पुढच्‍या दाराने गेल्‍यानंतर राजीनामा देऊन ते पुन्‍हा मागच्‍या दाराने राज्‍यसभेत गेलेत. त्‍यात त्‍यांच्‍या अफाट बुद्धीचा पराक्रमच होता. मी भाजपत गेल्‍यानंतर ते आले. कदाचित त्‍यांना इर्ष्या वाटली असावी म्‍हणून ते आले असतील; पण त्‍यात त्‍यांच्‍या बुद्धीचा सहभाग आहे, अशी टीकाही शिवेंद्रसिंहराजेंनी केली. पालिका निवडणुका आल्‍या, की ते जुन्‍या टेप वाजवतात. आता निवडणूक आलीय, ते नवीन डायलॉग घेऊन समोर येतील. सातारकरांनी चार महिन्‍यांचा विकास पाहिजे का, निरंतर नियोजित साडेचार वर्षे होणारा विकास पाहिजे, हे ठरविणे गरजेचे असून, कोणत्‍याही परिस्‍थितीत पालिकेच्‍या आगामी निवडणुका नगर विकास आघाडी स्‍वबळावर लढविणार असल्‍याचेही शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT