Udayanraje Bhosale challenge to Deputy Chief Minister Ajit Pawar over ed enquiry  
सातारा

हिंमत असेल तर समोरासमोर या..; उदयनराजेंचं अजितदादांना खुलं आव्हान

उमेश बांबरे

सातारा : माझ्यावर खंडणी मागीतल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. मंत्री, संत्री कोण काय बोललं मला माहित नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून केले आहे. (Udayanraje Bhosale challenge to Deputy Chief Minister Ajit Pawar over ed enquiry)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत याचे कारण सांगताना अप्रत्यक्षपणे उदयनराजेंवर आरोप केले होते. त्याला आज उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले आहे.

उद्यनराजे म्हणाले, उदयनराजे खंडणी मागतात, काय कारण.. आजपर्यंत मी ज्या ज्यावेळी उत्तर दिले की प्रत्येक वेळेस घरचा आहेर म्हटले गेले. पण मी भष्टाचराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही. मंत्री, संत्री असतील. त्याचे मला काहीही घेणे देणं नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी ईडीला करायला सांगा. उगाच फालतू दोन लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप करू नका. एखादा चांगले काम करत असेल तर त्याने कामच करायचे नाही का, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, तुम्ही काम करा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लोक लुटारू आहात, हे एकदा ठरवा. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे. ही लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील स्टाफही त्यांना ओळख देत नाही. पण आपले तसे नाही, आपली स्टाईल इज स्टाईल, असे म्हणत त्यांनी कॉलर उडवली.

एमआयडीसीची स्थापना झाली त्यावेळी मी तर शाळेत होतो, त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगून उदयनराजे म्हणाले, त्यावेळी एमआयडीसीला परवानगी दिली जात होती. डी झोन, सेंटर दिले जात होते. त्यावेळी मी नव्हतो. पण मी आल्यापासून ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती का पार पाडली नाही. तुमच्याकडून लोकांची अपेक्षा होती. केवळ सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी असली तरी त्यावेळचे खासदार आमदार यांनी का लक्ष दिले नाही, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, १९७४ मध्ये सातारा एमआयडीचीसी स्थापना झाली. त्याच वेळी नगरची ही झाली. आता सातारा एमआयडीची दुरवस्था का झाली. कोणी दुर्लक्ष केले. दुसऱ्यावर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार झाला. त्यावेळी एल ॲण्ड टी फॅक्टरी येणार होती, ती सिन्नरच्या माळावर का गेली हे आता त्यांनाच विचारा. येथील साईट सोडून बाहेरच्या जिल्ह्यात कंपन्या का गेल्या याला कोण कारणीभूत असा, प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.

एमआयडीसीत जागा विकत घ्यायची असेल तर कोणी घेतली. एमआयडीसीची लेआऊट तयार होतो. त्यावेळी विविध सुविधांसाठी जागा आरक्षित केली जाते. त्या व्यतिरिक्त प्लॉट विकत घ्यायचे आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाकडून परवानगी आणून तिचे निवासी जागेत रूपांतर करून घ्यायचे, असा प्रकार त्यांनी केला. आता माझ्यावर खंडणी मागतात, असा आरोप करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT