सातारा

सातारकरांच्या जयघाेषात उदयनराजेंनी केले महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन

सिद्धार्थ लाटकर

सातारा : वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. आता सर्वांना त्याच्या उद्‌घाटनाची प्रतीक्षा लागली हाेती. या पार्श्‍वभूमीवर आज (शुक्रवारी) खासदार उदयनराजे भोसले कामाची पाहणी करण्यापुर्वी पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर फित कापून ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवेश केला.

शहरातील पोवई नाक्‍यावरील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी येथे ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात आले. गेल्या पावणेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. आता या प्रकल्पाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले या ग्रेड सेपरेटरच्या सर्व मार्गिकांची आतून पाहणी करणार असल्याचे सांगितले. सातारा विकास आघाडीकडे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची मागणी सुरू झाल्यानंतर उदयनराजे यांनी लगेचच आज (शुक्रवार) पाहणीचे नियोजन करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यानूसार आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता खासदार उदयनराजेंनी सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या लवाजमासह ग्रेड सेपरेटरच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर पाेचले. 

आता घुमणार महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील रांगड्या मल्लांचा शड्डू

तेथे त्यांनी फित कापली. त्यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनाेज शेंडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व टी ऍण्ड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. त्यानंतर उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरी पाहणी केली. ग्रेड सेपरेटरचे काम 60 कोटी रुपयांचे होते. मात्र, गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त 15 कोटी रुपयांचा निधी लागल्याने संपूर्ण काम 75 कोटींवर गेले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली. 

साताऱ्याच्या बहादराची उद्योगात मुकेश अंबानींशी स्पर्धा; ‘दुकान’अ‍ॅप पुढे जिओ मार्ट हतबल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT