सातारा

"फालतू बोलू नका, कसलं राजकारण.., म्हणून तरं खंडणीची केस पडली माझ्यावर; उदयनराजे भडकले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : कास तलाव (Kass Lake) विकास आराखड्यात स्थानिकांना प्राधान्य देऊन पालिकेच्या जागेत स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी नुकतीच पालिका प्रशासनास दिल्या. सूचना देतानाच त्यांनी स्थानिक आंदोलकांशी चर्चा करत त्यांचे प्रश्‍न ऑन दि स्पॉट निकाली काढून भिंत वाढविण्याच्या कामाची पाहणी केली. 
 
कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम पालिकेकडून सुरू असून त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी कास येथील ग्रामस्थांनी आंदोलन करत काम बंद पाडले होते. या पार्श्‍वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्याबरोबरच कामाची पाहणी करण्यासाठी उदयनराजे हे त्या ठिकाणी गेले होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, उपाध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, वन विभाग तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उदयनराजेंनी कास तलाव परिसरातील स्थानिकांशी चर्चा केली. आंदोलकांनी रिंग रोड, ग्रामदैवत मंदिर, गावातील वीज सुविधा व इतर मागण्या मांडल्या. आंदोलकांच्या मागण्या, समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पालिका, वन विभाग, नगररचना विभागाने काय कार्यवाही केली, ते सांगण्याच्या सूचना उदयनराजेंनी केल्या. त्यानुसार ऍड. बनकर यांनी आंदोलकांनी केलेल्या मागण्यांबाबत नगररचना, वन विभाग, वीज वितरण आणि इतर कार्यालयांशी संपर्क साधत त्यांचे प्रस्ताव सादर केल्याचे सांगत काही प्रश्‍न निकाली निघाल्याचे तसेच नगररचना विभाग गावठाण मागणीची पूर्तता काही दिवसांत करणार असल्याची माहिती दिली.
 
भिंतीच्या कामामुळे पाणीसाठा वाढणार असून काही स्थानिकांच्या सर्व जमिनी त्यात जाऊन ते भूमीहिन झाल्याच्या मुद्यावर उदयनराजेंनी पालिकेच्या ताब्यात असणारी जागा भूमीहिन स्थानिकांना हॉटेल व इतर व्यवसायासाठी देण्याच्या सूचना केल्या. वन विभागाच्या कार्यपध्दतीबाबत स्थानिकांनी उपस्थित केलेले प्रश्‍न ऐकून उदयनराजेंनी भिंतीच्या कामासाठी अडीच वर्षे पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी काय काय करावे लागले, हे माझे मलाच माहीत आहे. ते असू द्या. पण, कोणत्याही स्थानिकावर अन्याय होणार नसल्याचा शब्दही ग्रामस्थांना दिला.
 
महाबळेश्‍वरसह इतर भागातील वनक्षेत्राच्या अनुषंगाने राज्य सरकारने आराखडा केला आहे. या आराखड्यात "वनसदृश जमिनी' असा उल्लेख असून तो भविष्यात महाबळेश्‍वर, पाचगणी, कास तसेच पाटणमधील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. स्थानिकांची डोकेदुखी कमी व्हावी, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून त्यासाठी दिल्लीत दोन वकील तयार ठेवल्याचेही उदयनराजेंनी स्थानिकांना सांगितले. 

राजकारण कसलं... गजकरण झालंय! 

पठारावरून कास भागातील गावांना जोडणारा रस्ता नेण्याऐवजी घाटाई मंदिराकडून नेण्यात आल्याचे सांगत एका स्थानिकाने त्यात राजकारण झाल्याचा आरोप केला. त्यावरून उदयनराजेंनी "फालतू बोलू नका, कसलं राजकारण. राजकारण करताय आणि म्हणताय, या राजकारणामुळे गजकरण झालंय. प्रश्‍न मार्गी लागणे आवश्‍यक आहे. स्थानिकांची अडचण होणार नाही, याकडे मी पाहीन. मध्यंतरी खंडाळ्यातील स्थानिकांच्या बाजूने उभा राहिलो आणि माझ्यावर दोन लाखांच्या खंडणीची केस झाली. ती कशी झाली, कुणी केली, जाऊ दे, असे वक्‍तव्यही उदयनराजेंनी यावेळी केले.

वैतागलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना पाठवली नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Dharmendra Pradhan salary : केंद्रीय कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांवर सरकारचा दरमहा किती खर्च? धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून समजून घ्या

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT