Udayanraje Bhosale Sharad Pawar Collar Style esakal
सातारा

शरद पवारांनी माझी स्टाइल मारली, त्याला मी काय करणार? 'कॉलर उडवायच्या स्टाइल'वर उदयनराजेंचं मिश्किल उत्तर

प्रत्येकाचा शेवट होत असतो. श्वास कधी थांबेल हे कोणीही सांगू शकत नाही.

सकाळ डिजिटल टीम

'प्रत्येकाचे विचारही वेगवेगळे असतात. पक्ष बाजूला ठेवा. प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे. जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये, म्हणून सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे.'

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी बावधनच्या बगाड यात्रेस (Bavdhan Bagad Yatra) भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी उमेदवारीबाबत भाजपकडून (BJP) फसवाफसवीचे राजकारण होत नाही ना, या प्रश्नावर मिस्कीलपणे उत्तर दिले. फसवाफसवी पिक्चर बघा म्हणजे सगळं कळेल, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये, प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे, तसेच आपली परंपरा टिकण्यासाठी बावधनच्या बगाडाची परंपराही टिकली पहिजे, असेही त्यांनी नमूद केले. बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा होती. या यात्रेतील बगाड्याच्या दर्शनासाठी खासदार उदयनराजे भोसले तेथे गेले होते. या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

तुम्ही बगाडाकडे काय मागणं घातलं, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘आपण सर्वांनी बंधुभावाने राहिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, तरच या देशाची परंपरा अबाधित राहणार आहे. प्रत्येक जण काहीतरी बोलत असतो. देशाला अखंड ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना अबाधित राहिली पाहिजे. हाताची पाच बोटे एकसारखी नसतात. त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचारही वेगवेगळे असतात. पक्ष बाजूला ठेवा. प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे. जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये, म्हणून सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे, तसेच प्रत्येकाने स्वत:च्या अंत:करणातून बोलले पाहिजे.

बावधनच्या बगाडाची परंपरा टिकली पहिजे. प्रत्येकाचा शेवट होत असतो. श्वास कधी थांबेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात लोकांच्या हिताचे काम केले पाहिजेत ही माझी प्रमाणिक इच्छा आहे.’’ भारतीय जनता पक्ष तुमच्याशी फसवाफसवीचे राजकारण करत नाही ना? लोकसभेच्या उमेदवारीबाबत राजघराण्याला लांब ठेवले जातंय का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘हा बगाडाचा विषय आहे. यामध्ये राजकारण आणू नये. फसवाफसवी हा पिक्चर आहे. तो बघा म्हणजे सगळं कळेल.’’

ते पवारसाहेब आहेत...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी तुमची कॉलर उडवायची स्टाइल केली होती. त्यावर उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले, ‘‘ते पवार साहेब आहेत.’’ माझी स्टाइल मारली त्याला मी काय करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : चार दिवसांनंतर शेअर बाजार ‘हिरवा’ पण लगेचच ‘लाल’; कोल इंडियाचा IPO आजपासून खुला; कोणते शेअर्स घसरले?

धुरंधरला टक्कर देण्यासाठी सज्ज ‘द राजा साब’; प्रदर्शित होण्याआधीच झालेली कोट्यवधींची कमाई, आजचं कलेक्शन किती?

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरला आठ दिवसांआड पाणी हे सरकारचे पाप

CM Devendra Fadnavis : दोन महिन्यांत मिळणार शहराला रोज पाणी! मुख्यमंत्र्यांनी दिली नवी डेडलाइन

Crime News : धक्कादायक! व्यसनाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापानं केला मुलाचा खून; Heart Attack ने मृत्यू झाल्याचा केला होता बनाव

SCROLL FOR NEXT