सातारा

Video पाहा : उदयनराजेंचा जलमंदिर पॅलेस टू सुरुची बंगला प्रवास; सातारकरांच्या भुवया उंचावल्या

सिद्धार्थ लाटकर

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे आज (साेमवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे निवासस्थान असलेल्या सुरुची बंगला येथे सुमारे सकाळी साडे अकराच्या सुुमारास गेले. उदयनराजेंची गाडी सुरुची बंगला येथे जाताच हे दृष्य पाहणा-या नागरिकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले हे त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त हाेते. नागरिकांची एक एक कामे त्यांच्याकडून केली जात हाेती. दरम्यान त्याचवेळेत उदयनराजेंची गाडी सुरुचीत येताच तेथील उपस्थित नागरिकही अंचबित झाले.

उदयनराजे हे गाडीतून उतरताच शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या हातात एक पत्रिका दिली. दाेघांमध्ये थाेडक्यात संवाद झाला आणि त्यानंतर उदयनराजे हे त्यांच्या दैनंदिन कामासाठी सुरुची बंगल्यातून बाहेर पडले. 

दरम्यान नाशिक येथे असलेले नातेवाईकांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी गेले हाेते. ही भेट काैटुंबिक हाेती. या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे दाेन्ही राजेंच्या निकटवर्तीयांनी ई-सकाळशी बाेलताना नमूद केले.

पंढरीच्या मठातील धरपकडीवर अक्षयमहाराज आक्रमक

सातारकरांनाे! लॉकडाउन टाळणे आपल्याच हाती

Covid19 Update : दहिवडी, लाेणंदला आढळले सर्वाधिक बाधित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT