सातारा

सातारकरांनाे... रुग्णांसाठी बेड मिळत नाहीये, मग हे वाचा

उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीत 200 ऑक्‍सिजन बेड व 50 व्हेंटिलेटरची सुविधा असलेले जम्बो फॅसिलिटी सेंटर सुरू करण्यास रविवारी (ता.30) मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. येत्या 15 दिवसांत हे सेंटर सुरू करण्याची सूचना त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री व मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.
आमच ठरलं ! आठ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन 
 
सातारा जिल्ह्यात दररोज कोरोनाचे सहाशेच्यावर रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे बेड कमी पडू लागल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व जिल्हा प्रशासनावर प्रचंड ताण वाढला आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जम्बो रुग्णालय सुरू करण्यासाठीचा 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्‍यक होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे होते. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्याला जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर सुरू करण्यासाठी रविवारी (ता.30) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली.

कोरोनामुळे साताऱ्यात सर्वाधिक मृत्यू; ज्येष्ठांची संख्या लक्षणीय 

या चर्चेत श्री. देसाई यांनी मांडलेला मुद्दा लक्षात घेऊन तातडीची गरज म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य व गरज ओळखून जम्बो हॉस्पिटलला तत्काळ मान्यता दिली. मुख्य सचिव संजयकुमार यांना साताऱ्यात 200 ऑक्‍सिजन बेड व 50 व्हेंटिलेटर सुविधांचे जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर उभारण्यास सुरवात करण्याचे आदेश दिले. मंत्री देसाई यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार साताऱ्यात जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोयना धरणातील पाणीसाठ्याचे शतक; पायथा वीज गृह कार्यान्वित 
 
मुख्य सचिव संजयकुमार यांनी तातडीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधत याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना केली. त्यामुळे पुण्याप्रमाणे साताऱ्यातही जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर सुरू होणार आहे. हे कोविड सेंटर छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीत होणार आहे. त्याची पाहणी मंगळवारी (ता. 1) मंत्री देसाई हे सर्व अधिकाऱ्यांसमवेत करणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होणार आहे. येत्या 15 दिवसांत हे सेंटर सुरू होण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे. 

भरतगाववाडीची तब्बल 229 वर्षांची परंपरा खंडित; गणेशाचा भंडारा रद्द 

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यात जम्बो कोविड हॉस्पिटल उभारले जाईल. शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीत हे हॉस्पिटल होणार आहे. या हॉस्पिटलमुळे जिल्ह्यातील कोविडच्या रुग्णांना वेळेत व तातडीने उपचार मिळणार आहेत. 

-शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जैन मंदिर किंवा मंत्रिपद वाचवा', मोहोळ यांना मुंबईत वरिष्ठांनी वॉर्निंग दिल्याचा धंगेकरांचा खळबळजनक दावा

HIV infected Blood : हॉस्पिटलचा हलगर्जीपणा, थॅलेसिमियाग्रस्त ५ मुलांना चढवले एचआयव्ही संक्रमित रक्त

Adani LIC fund: अदानींना मिळणार होता ‘एलआयसी’चा निधी; ‘वॉशिंग्टन पोस्ट’चा खळबळजनक गौप्यस्फोट

Shaktipeeth Highway Controversy : ‘शक्तिपीठ’प्रश्‍नी सरकारचे एक पाऊल मागे? कोल्हापूर–सांगली मार्गात बदलाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT