सातारा

रेशन दुकानदारांकडून गरिबांची पिळवणूक; पुरवठा विभागाचे प्रचंड दुर्लक्ष

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : परिसरातील अनेक गावांमध्ये रेशनधान्य दुकानदारांचा काळाबाजार सुरू आहे. केंद्र सरकारतर्फे रेशनकार्डवरील प्रतिव्यक्तीस पाच किलो अन्नधान्य देण्यात येते. मात्र, अद्यापही अनेक रेशन दुकानदार गरिबांची पिळवणूक करत आहेत. गरिबांना कमी धान्य दिले जात असून, तर निर्धारित किलोप्रमाणे धान्यही मिळत नाही व पावतीही दिली जात नाही, तसेच पैसेही अधिकचे घेण्याचे प्रकार स्वस्त धान्य दुकानांमध्ये सर्रास सुरू आहेत.
 
बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांतून माल मिळतो. मात्र, त्यातही स्वस्त धान्य दुकानदार माल देताना "कात्री' लावतात. पॉस मशिनवर संबंधित शिधापत्रिकाधारकाचा अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतर माल दिला जातो. मात्र, ग्राहकाला किती माल दिला, याचे बिल दिले जात नाही. सोबतच निर्धारित किलोप्रमाणे धान्यही मिळत नाही. पैसेही अधिकचे घेण्याचे प्रकार स्वस्त धान्य दुकानांमध्ये सर्रास सुरू आहेत. 

हे सर्व होत असताना काळे धंदे करणारे व्यापारी या दुकानदारांना हाताशी धरून रेशनवरील तांदूळ, डाळ खरेदी करत आहेत, तसेच ट्रक भरून रेशनचा माल जिल्ह्याबाहेर पोचवून काळाबाजारात विकण्याचा प्रकार होत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. अनेक रेशन दुकानदार गरजू व्यक्ती दुकानावर गेल्यावर सांगण्यात येते, की तुमच्या नावाचा शिधा मिळालेला नाही किंवा तुमचे नाव यादीत आले नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन देत असलेल्या तांदूळ, डाळ हे धान्य आलेले नाही, असेही दुकानदार सांगत आहेत. 

कित्येक दुकानदारांनी तर दोन महिन्यांचा तांदूळ, डाळ वाटपच केले नाही. तूर आणि हरभरा डाळ दोन्हीही शासनाकडून येते; परंतु दोहोंपैकी कोणतीही एकच डाळ आलेली आहे, असे दुकानदार सांगत आहेत. याबाबत संबंधित तालुका पुरवठा शाखेत तक्रार केली असता संबंधित अधिकारी रेशन दुकानदाराची बाजू घेत नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत हाकलून देत असल्याचे नागरिक बोलत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament debate: "राईट टू रिकॉल" म्हणजे काय? काम न करणारे आमदार-खासदार बरखास्त होणार? संसदेत झाली चर्चा

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांचा आज 'भारत बंद'; देशव्यापी बंदमुळे जनजीवनावर परिणाम होणार!

अत्याचार प्रकरणी ४० दिवस कोठडीत, तरी KDMC पालिकेनं दिला पगार; पोलिसांनाही माहिती नव्हतं तो पालिकेत कार्यरत

Solapur Crime: माढा तालुक्यातील नवविवाहितेचा खून; बार्शीच्या सत्र न्यायालयाने जाऊबाईस सुनावली जन्मठेपची शिक्षा!

Rahul Gandhi : ‘भारतमाते’ला विकले; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्ला

SCROLL FOR NEXT