सातारा

सोने-चांदी व्यावसायिकाला लुटले; वनाधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : हातउसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून एका सोने-चांदी व्यावसायिकाला वनाधिकारी व त्यांच्या पत्नीने पाच जणांच्या मदतीने जबरदस्तीने कारमध्ये बसवून 5 लाख 43 हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोने घेऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शनिवारी (ता.12) रात्री घडली. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह त्यांची पत्नी व अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये वन अधिकारी विलास काळे, उज्ज्वला विलास काळे यांसह अज्ञात पाच जणांचा समावेश असल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली.
 
पोलिसांनी सांगितले, की सोने-चांदी व्यावसायिक सुहास विश्वनाथ शेटे (सध्या रा.पाटण, मूळ रा.मल्हारपेठ, ता.पाटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाटण येथे सोने-चांदीचे दुकान आहे. संशयित विलास काळे हे दुकानात सोने खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी तोंडओळख झाली होती. सन 2017 मध्ये संशयित काळे यांच्याकडून फिर्यादीने 12 लाख रुपये हातउसने घेतले होते. सात ते आठ महिन्यांत पैसे परत करतो, असे काळे यांना सांगितले होते. मात्र, काळे यांना पैसे देणे जमले नाही. परंतु, सन 2017 मध्येच सोने व 1 लाख रुपये असे मिळून साडेतीन लाख रुपये दिले होते. त्यानंतर सन 2018 मध्ये 80 हजार रुपयांचे सोने काळे यांनी खरेदी केले.

खासगी डॉक्‍टर सरकारी दरात देणार सेवा : पृथ्वीराज चव्हाण

त्याचे काळे यांनी पैसे दिले नव्हते. त्यानंतर 70 हजार रुपये काळे यांना दिले आणि उर्वरित पैसे जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर देतो, असे फिर्यादीने सांगितले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये संशयित विलास काळे व त्यांची पत्नी उज्ज्वला काळे व इतर दोघांनी फिर्यादीच्या घरी येऊन पैशाची मागणी केली आणि पैसे नसतील तर तुमची जागा माझ्या नावावर करून द्या, अशी दमदाटी करून निघून गेले.

पाचगणी, महाबळेश्‍वरातील खासगी बंगल्यांत अनधिकृतपणे लॉजिंग!

यादरम्यान 11 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी काळे व त्यांची पत्नी घरी आले. त्यांच्याबरोबर सुरेश पाटील तसेच उज्वला काळे यांच्यासोबत दोन कारमधून पाच ते सहा जण आले होते. या महिन्यात निम्मे पैसे देतो व पुढच्या महिन्यात राहिलेले पैसे देतो, असे फिर्यादीने सांगितले. मात्र, काळे यांनी पैसे आत्ताच व्याजासह घेणार आहे, असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर 12 रोजी रात्री शितळवाडी गावच्या हद्दीत रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या कारला कारचालकाने आडवी मारून थांबवून अज्ञात पाच जणांनी फिर्यादीच्या कारचा ताबा घेऊन फिर्यादीस मागे बसवले आणि कार उरूल घाटातून कऱ्हाड बाजूला घेऊन गेले.

कोरोनाशी लढत लढतच जगायला शिका : रामराजे निंबाळकर

या वेळी उज्वला काळे यांच्या सांगण्यावरून अज्ञातांनी जबरदस्तीने फिर्यादीकडून एटीएममधून 5 लाख 43 हजार रुपये व 3 ग्रॅम सोन्याचे वेढणी घेऊन फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करत उंब्रज येथे सोडून दिल्याचे फिर्यादीत नमूद केले. यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी विलास काळे यांच्यासह त्यांची पत्नी उज्वला काळे व अज्ञात पाच जणांवर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

SCROLL FOR NEXT