khatav 
सातारा

पुसेगावात शाळेला मिळाली ही अनोखी भेट

सकाळ वृत्तसेवा

पुसेगाव (जि. सातारा) ः कोरोना महामारीमुळे सारे जग विविध संकटांचा सामना करत आहे. अशा वेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच शाळेच्या परिसराचेही रक्षण व्हावे, यासाठी श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सन 1994 च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी या शाळेला आरोग्य सुरक्षा उपकरणांची अनोखी भेट दिली आहे. 

यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सेवागिरी शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ""कोरोना साथीच्या कालावधीत सध्या शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी वस्तुरूपाने केलेली मदत शाळेने केलेल्या संस्काराची देणे आहे.'' 

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव जाधव होते. या वेळी अविनाश माधव जाधव यांनी दोन थर्मल मीटर भेट दिले. जगदीश जाधव, सुनील क्षीरसागर, अजित गायकवाड, सचिन नवगण, प्रवीण पवार, सुचिता पवार, रूपाली देशमुख, जयश्री तोडकर, वैशाली नाळे, मृणाली पांढरे-गुरव, गणेश शेडगे, उमेश जाधव, महेश पवार, प्रवीण जाधव या माजी विद्यार्थ्यांनी औषध फवारणी पंप, सॅनिटायझर, फिनेल, ऍसिड, हॅंडवॉश, मास्क, साबण, नॅपकीन आदी वस्तू सुपूर्त केल्या. 

कार्यकमास श्री सेवागिरी देवस्थानचे अध्यक्ष मोहनराव जाधव पाटील, सेवागिरी ट्रस्टचे विश्वस्त योगेशराव देशमुख, सदस्य जयंतराव जाधव, एस. आर. पाटील, प्राचार्य दिलीप काळे, पर्यवेक्षक सुधाकर माने उपस्थित होते. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले. संजय जाधव यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Update : साखरेचे भाव 20 टक्क्यांनी घसरले! सट्टेबाजी अन् साठेबाजी रोखण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 15 दिवसांचा कोटा लागू

Smart Meter Complaints: ‘स्मार्ट मीटर’बाबत सर्वाधिक २६६ तक्रारी महावितरणच्या ग्राहक समाधान शिबिरात ४०४ तक्रारी दाखल

Kolhapur GI Tag: अस्सल कोल्हापुरी शेतीमाल ‘जीआय’च्या प्रतीक्षेत; रानमेवा, मध, भात, नाचणीचा समावेश शक्य; कृषी विभाग, बाजार समित्यांनी घ्यावा पुढाकार

Maharashtra Monsoon Prediction : हिंगोलीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Air India Employee Wife Death : एअर इंडिया कर्मचाऱ्याच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, ९ वर्षांची मुलगी समोरचं घटना; पतीच्या मोबाईलमध्ये फोटो नेमका कोणाचा?

SCROLL FOR NEXT