Ashwini Pawar esakal
सातारा

पंचायत समितीच्या सभापतिपदी NCP च्या अश्विनी पवारांची बिनविरोध निवड

रमेश धायगुडे

पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस तीन, काँग्रेस एक, भाजप एक व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे.

लोणंद (सातारा) : खंडाळा पंचायत समितीच्या (Khandala Panchayat Committee) सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) अश्विनी विपुल पवार (Ashwini Pawar) यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.

पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडीसाठी काल सकाळी साडेअकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावली होती. या वेळी बैठकीसाठी माजी सभापती राजेंद्र तांबे व मकरंद मोटे, उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटील, सदस्या अश्विनी पवार, शोभा जाधव व चंद्रकांत यादव उपस्थित होते. सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अश्विनी पवार, तर भाजपचे चंद्रकांत यादव यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या वेळेत यादव यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सभापतिपदी अश्विनी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जाधव यांनी घोषित केले.या कामी गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांनी सहकार्य केले.

Khandala Panchayat Committee

पंचायत समितीत एकूण सहा सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, काँग्रेसचे एक, भाजपचे एक व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. ज्‍येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांच्यानंतर पवार यांच्या माध्यमातून बऱ्याच कालावधीनंतर पारगावला सभापतिपद मिळाले आहे. त्यामुळे पारगाव ग्रामस्थांना आनंद झाला आहे. सभापती पवार यांचे दत्तानाना ढमाळ, नारायणराव पवार,राजेंद्र तांबे, मकरंद मोटे, चंद्रकांत यादव, बाळासाहेब जाधव, भानुदास यादव आदींनी सत्कार करून अभिनंदन केले.

आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिलांपर्यंत शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोचवून निश्चितच लोकहितासाठी उरलेल्या कालावधीत जोमाने काम करणार आहे.

-अश्विनी पवार, सभापती, खंडाळा पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT