Ushadevi Sabale Patil  
सातारा

सत्यशोधक चळवळीतील उषादेवी साबळे-पाटील यांचे निधन

संताेष साबळे

शिवथर (जि. सातारा) : येथील स्वातंत्र्यसेनानी उषादेवी किसनराव साबळे- पाटील यांचे (वय 88) वृद्धापकाळाने बुधवारी (ता.31 मार्च) निधन झाले. (कै.) स्वातंत्र्यसेनानी किसनराव साबळे- पाटील यांच्या सहचारिणी, प्रदीप साबळे- पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे- पाटील यांच्या त्या मातोश्री व पाडळी (ता. कोरेगाव) येथील सत्यशोधक बाळासाहेब फाळके त्यांच्या भगिनी होत. 

उषादेवी या सत्यशोधक चळवळीमध्ये सातत्याने सहभागी होत्या. स्वातंत्र्यसंग्राम चळवळ व गोवा मुक्ती लढ्यामध्ये सातत्याने पुढाकार घेत महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत किसनराव साबळे- पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्या भक्कमपणे उभ्या होत्या.

शिवथर पंचक्रोशीमध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना उभी करत शेकडो कुटुंबीयांचे विवाह सोहळे साजरे करून पंचक्रोशीमध्ये त्यांनी आदर्श निर्माण केला. दोन्ही मुलांना समाजकार्य करत असताना त्यांनी राजकीयदृष्ट्या मार्गदर्शन करत गावच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन उपक्रमांची योजना हाती घेतल्या. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

PMC News : पुणे महापालिका भाडेतत्त्वावर घेणार २५० घंटागाड्या; कचरा संकलन व्यवस्था होणार अधिक सक्षम

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

SCROLL FOR NEXT