Vaccination esakal
सातारा

VIDEO : सातारकरांनो! ..तरच तुम्हाला कस्तुरबा रुग्णालयात मिळणार लस

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यातील कोरोना (Coronavirus) रूग्णवाढीचा मे महिन्यात रेकॉर्डब्रेक वेग वाढला होता. एका बाजूला रूग्णवाढीचे आकडे कमी होत नसताना दुसरीकडे रूग्णांच्या आकड्यांचा घोटाळा समोर आल्याने जिल्हावासियांतील संभ्रम प्रचंड वाढला आहे. रूग्णवाढीतून सावरण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे 31 मे आणि 1 जून या दिवशी कराडसह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) नागरिकांची प्रचंड धावपळ उडवली. वातावरणातही अचानक बदल झाल्याने लहान मुलांमध्ये सर्दी, खोकल्याच्या आजाराचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली. त्यातच जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांत प्रचंड घबराट पसरली आहे. (Vaccination Campaign Started At Kasturba Hospital In Satara)

सध्या जिल्ह्यातील रूग्णवाढ दोन हजाराच्या खाली येत नसताना लसीकरणही मंदावले आहे. लसीकरणासाठी अजूनही जिल्हावासिय हेलपाटे मारतच आहेत.

सध्या सातारा जिल्ह्यांतील काही केंद्रांवर लसीकरण (Vaccination) सुरु आहे, तर काही केंद्रं लसीअभावी बंद ठेवण्यात आली आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील (Shahupuri Police Station) कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) टोकनव्दारे लसीकरण मोहीम सुरु असून नागरिकांना लस दिली जात आहे. हाॅस्पिटलच्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिनचे 230 डोस, तर 60 डोस काॅविशिल्ड लसीचे (Covaxin-Covishield) उपलब्ध झाले आहेत.

Vaccination

दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयात पोलिसांच्या (Police) बंदोबस्तात ही लस दिली जात असून जागेअभावी शंभर टोकनच नागरिकांना देण्यात येत आहेत. तसेच ज्यांना कोविशिल्ड लस घ्यायची आहे, त्यांनी पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसानंतर दुसरी लस घेण्याचे आवाहन डाॅक्टरांसह पोलिसांकडून करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील रूग्णवाढ दोन हजाराच्या खाली येत नसताना लसीकरणही मंदावले आहे. लसीकरणासाठी अजूनही जिल्हावासिय हेलपाटे मारतच आहेत. रूग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी वेगाने लसीकरण करायला हवे. त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळवण्यासाठी वाट पहावी लागत आहे, तर पहिला डोस घेणारांना ‘आज एवढाच साठा उपलब्ध आहे’ असा फलक लसीकरण केंद्रांवर पाहून मागे फिरावे लागत आहे.

Vaccination Campaign Started At Kasturba Hospital In Satara

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९-१० तास काम, ओव्हटाइम नाही, दिवसाला ६५० रुपयेच मिळतात; PMPLच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, VIDEO VIRAL

धर्मस्थळ प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेने केला धक्कादायक खुलासा; 'त्या' पुरलेल्या 100 हून अधिक मृतदेहांचे सत्य उलगडणार?

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या! ED नंतर मुंबईत CBIचा छापा; काय आहे 2,000 कोटींच प्रकरण?

ती प्राजक्ता नाहीच! गोविंदा आणि सुनीताच्या चर्चित घटस्फोटामुळे मराठी अभिनेत्रींची का सुरू आहे बदनामी?

Latest Marathi News Updates : नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT