सातारा

नववधू दोन लाखांसह पळाली, पुण्यासह साेलापूर जिल्ह्यातील आठ जणांना अटक

आयाज मुल्ला

वडूज (जि.सातारा)  : लग्नाच्या रात्रीच नववधूने सव्वालाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांच्या ऐवजासह पोबारा केला. भुरकवडी (ता. खटाव) येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Video : जगात भारी, सातारच्या प्रद्युम्नची घोडे सवारी
 
याबाबत विशाल दिनकर जाधव (रा. भुरकवडी, ता. खटाव) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, विशाल हे भुरकवडी येथे आई लक्ष्मी, वडील दिनकर व बंधू तुषार असे एकत्र राहतात. विशाल यांना लग्नासाठी नातेवाईक सचिन गुलाबराव घाडगे (रा. खटाव) यांनी करंडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे एक मुलगी असल्याचे सांगितले. तिचे छायाचित्रही दाखविले. जाधव यांचे नातेवाइकांना मुलीची हकिकत सांगितली. त्यानुसार वधू पूजा शिवाजी शिंदे (रा. करंडी, जि. पुणे) ही पसंत असल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर सोमवारी (ता. 10) सचिन घाडगे यांच्या ओळखीतील रवींद्र सुदाम जाधव (रा. बसाप्पाचीवाडी, वडूथ), रोशन इन्नूस तांबोळी, इन्नूस अमिर तांबोळी (रा. रामनगर, हडपसर, पुणे), वर्षा रमेश फडतरे (रा. सिद्धार्थनगर, मोहोळ, जि. सोलापूर) हे वधू पूजा तिची बहिणी वैशाली यांच्यासह सायंकाळी सात वाजता भुरकवडी येथे आले. त्यांनी जाधव यांच्या घर व शेतीची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी (ता. 11) या वधू-वरांचा विवाह घेण्याचे दोन्ही बाजूंकडून निश्‍चित झाले.

पाटणला लॉकडाउनमध्येही वाढदिवसाच्या पार्ट्यांत तरुणाई बेभान! - 

सर्वांत माेठी बातमी : सहकारमंत्र्यांना मुंबईला हलविणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मंगळवारी सकाळी 11 वाजता भुरकवडी येथे जाधव यांच्या राहत्या घरी विशाल व पूजा यांचा हा विवाह करण्यात आला. त्यानंतर वधू पूजा हिच्यासोबत आलेले सचिन घाडगे, रवींद्र जाधव, रोशन तांबोळी, इनूस तांबोळी, वर्षा फडतरे हे निघून गेले, तर वधू पूजा व तिची बहीण वैशाली ताकवले या दोघी राहिल्या होत्या.

करुन दाखवलं : कऱ्हाड पालिका देशात अव्वल

रात्री जेवण करून सर्व कुटुंबीय झोपल्यानंतर बुधवारी (ता. 12) रात्री सव्वाबारा वाजता वैशाली ताकवले ही घरातून बाहेर येऊन उलटी करीत होत्या. त्या वेळी त्यांनी आपणांस अपचन व पित्त झाले असून, तुम्ही झोपा असे सांगितले. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपण जागे झालो असता पूजा व तिची बहीण वैशाली या दोघी घरात दिसून आल्या नाहीत. त्यामुळे आपण त्यांची शोधाशोध केली असता त्या आढळून आल्या नाहीत, तसेच घरातील साहित्याची पाहणी केली असता रोख रक्कम व सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इंफेक्‍शन? 

एक लाख 25 हजार रुपयांची रोख रक्कम, 60 हजार रुपये किमतीचे आई लक्ष्मी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, तसेच वधू पूजा हिला लग्नात घातलेले 15 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे मनीमंगळसूत्र असा एकूण दाेन लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले.

कर्मचारी जीवावर उदार, करताहेत कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार!

या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी केला. याप्रकरणी सचिन घाडगे, रवींद्र जाधव, रोशन तांबोळी, इनूस तांबोळी, वर्षा फडतरे, पूजा शिंदे (रा. रुई कांचन, सोरतापवाडी, ता. हवेली, पुणे), वैशाली ताकवले, अनिकेत मोहन घोलप (रा. बाळे, जि. सोलापूर) या आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT