Accident Sakal
सातारा

वाई-पाचगणी मार्गावर पसरणी घाटात बस जाळून खाक

वाई- पाचगणी रस्त्यावर नागेवाडी फाट्याजवळ दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : पसरणी घाटात आज एका खाजगी बसने अचानक पेट घेतला. वाई- पाचगणी रस्त्यावर नागेवाडी फाट्याजवळ दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून खाक झाली.रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पसरणी घाटात वाहतूक मोठ्या प्रमाणात होती. (Satara Accident News)

माणगांव (गोरेगांव) ता.महाड येथील खाजगी कंपनी मधील काही कर्मचारी खाजगी लक्झरी बस (क्र.एम एच -०६ एस ९३५४) ने पंढरपूरला दर्शनासाठी गेले होते. आज सकाळी पंढरपूरहुन निघून मांढरदेवीमार्गे महाबळेश्वरला निघाले होते. पसरणी घाटात नागेवाडी फाटा (सोळा नंबर स्टॉप) येथे बस आली त्यावेळी शेजारून जाणाऱ्या वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचे चालकास सांगून सतर्क केले.

चालक रवींद्र कोळसकर (वय ४७ वर्षे रा.माणगांव) यांनी प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील सर्व प्रवाशी खाली उतरविले.त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.या बसमध्ये लहान मुलांसह ३९ प्रवाशी होते. या घटनेची माहिती मिळताच वाई व पांचगणी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वाई-पाचगणी अग्निशमन बंबाला पाचारण केले. वाई पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे प्रयन्त केला. दरम्यान संपूर्ण बस जाळून खाक झाली. या घटनेमुळे वाई-पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.बस विझविल्या नंतर पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT