सातारा

सरपंच आरक्षणावरुन 'वंचित'चे मुख्यमंत्र्यांना पत्र; सोडत नव्याने घ्या

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सरपंच आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सदस्यांवर अन्याय झाला आहे. या सोडतीत अनेक त्रुटी राहिल्याने या प्रवर्गातील सदस्य नेतृत्वापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतील त्रुटी दूर करून पुन्हा नव्याने आरक्षण सोडत घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, याकडे दुर्लक्ष केल्यास वंचिततर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

निवेदनात खंडाईत यांनी म्हटले की, लोकशाही प्रवाहात आजही अनुसूचित जाती - जमाती वर्गाला मनापासून कोणीही निवडून देत नाही; परंतु आरक्षणाच्या तरतुदीमुळे त्यांना निवडून आणले जात आहे. आज ही या प्रवर्गातील लोकसंख्येचे प्रमाण कमी असल्याने त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही. मात्र, आरक्षणाच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर सरपंचपदासाठीही आरक्षणाची तरतूद असल्यानेच केवळ सरपंच बनण्याची संधी मिळत आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने सोडत प्रक्रिया राबवल्याने या प्रवर्गातील सदस्यांना मिळणाऱ्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब गंभीर आहे. आरक्षण सोडतीवेळी अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या जास्त असणाऱ्या गावांची नावे काढली जातात. त्यामध्ये पहिल्या निम्म्या गावांना महिला व निम्म्या गावांना पुरुष आरक्षण लावले जाते. त्यामुळे पहिल्या निम्म्या गावात जिथे महिला आरक्षण काढले आहे. त्या गावामध्ये महिला उमेदवार निवडून आल्याच नाही, तर महिला सरपंच कसा होणार असा प्रश्‍न करून तेथील या प्रवर्गातील पद रिक्त राहते. तिथे पुरुष निवडून आला, तरी त्याला सरपंच होता येत नाही.

त्यामुळे आरक्षण असूनही अनुसूचित जाती व जमातीच्या निवडून आलेल्या उमेदवारांना सरपंचपदापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे आरक्षणाचा उद्देशच असफल होताना आढळतो. अशा पद्धतीची सोडत करताना जेवढ्या गावांची यादी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणासाठी निवडली असतील. त्यातील 50 टक्के महिलांसाठी राखून ठेवताना त्या गावात महिला उमेदवार निवडून आल्या आहे का, याची खात्री करूनच त्या 50 टक्के गावांची नावे काढूनच ती महिलांसाठी राखीव ठेवल्यानंतरच उरलेल्या गावांची नावे पुरुषासाठी राखीव ठेवल्याचे जाहीर करावे.

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे; तारळे टपाल कार्यालयात ग्रामस्थांना बसला सुखद धक्का

कुशलचे लाभार्थी अनुदानापासून वंचित; माणला 14 लाखांच्या निधीची गरज

बाप रे! कारवट गावाच्या हद्दीत बसचे चाक निखळले; अनर्थ टळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; निफ्टी 70 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

Indian Army Kupwara Encounter : नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली; लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दल सतर्क

Ind Vs Aus ODI : भारताविरुद्ध मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! सलामीवीर फलंदाजासह फिरकीपटू संघातून बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Live Update : महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT