Vedanta Nangare Vedanta Nangare
सातारा

शाब्बास! ओडिशात कऱ्हाडच्या 'आयर्न मॅन'ची झक्कास कामगिरी

ओडिशात झालेल्या स्पर्धेसाठी भारतातून 150 स्पर्धकांनी स्प्रिंट, हाफ व फुल डिस्टन्स रेसमध्ये भाग घेतला.

सकाळ टीम

कऱ्हाड (जि. सातारा) : ओडिशा येथे झालेल्या हर्क्‍युलीन ट्रायथलॉन स्पर्धेत येथील वेदांत अभय नांगरे याने सलग दुसऱ्या वर्षी "हर्क्‍युलीन ट्रायथलॉन' मेडल पटकावले. त्याने साडेतीन किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे हे सलगपणे केवळ 15 तास 41 मिनिटांत पूर्ण केले.

ओडिशा येथे झालेल्या स्पर्धेसाठी भारतातून 150 स्पर्धकानी स्प्रिंट, हाफ व फुल डिस्टन्स रेसमध्ये भाग घेतला. फुल डिस्टन्स रेसकरिता 20 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत साडेतीन किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे करायचे होते. ही स्पर्धा 17 तासांपूर्वी पूर्ण करणे आवश्‍यक असते. वेदांतने सलगपणे केवळ 15 तास 41 मिनिटांत ते पूर्ण केले. स्पर्धेच्या तयारीदरम्यान कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनने पोहण्याची तयारी करणे कठीण होते.

मात्र, स्विमिंग टॅंक सुरू होईपर्यंत वेदांतने परिसरातील वेगवेगळ्या तलावांमध्ये पोहण्याची तयारी केली. याचबरोबर परिसरातील रस्ते तसेच डोंगर-दऱ्यांमधून सायकलिंग तसेच धावण्याचा सराव केला. या खडतर स्पर्धा भारताबाहेर होतात. स्पर्धेतील स्पर्धकांना "आयर्न मॅन' म्हणून संबोधले जाते. वेदांतला त्याचे आई-वडील यांच्याबरोबरच खासदार श्रीनिवास पाटील, त्यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील, युवा नेते सारंग पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. वेदांतच्या यशाबद्दल खासदार पाटील, सारंग पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival 2025 : डोंबिवलीतील प्रसिद्ध डायमंडच्या राजाचे आगमन थाटात; उभे रिंगणांनी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी...

Sprouts Benefits: दररोज मोड आलेलं धान्य खाणं आरोग्यासाठी लाभदायक; जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे!

Ahilyanagar fraud: 'बनावट नोटांद्वारे फसवणूक; तिघे गजाआड', एक कोटीच्या बनावट नोटा जप्त

Latest Marathi News Updates : अमित साटम मुंबईचे अध्यक्ष होणार, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

Pune News : सिंहगडावर बेपत्ता झालेला तरुण कसा सापडला? चार दिवस अन्न-पाण्याशिवाय कड्यात अडकलेला...

SCROLL FOR NEXT