vegetable business inspiring story of Ushatai Dinde satara sakal
सातारा

Inspiring Story : भाजीपाला, वाहतूक व्यवसायातून सावरला संसार

उमेद गळालेल्या पंखात नवे बळ भरणाऱ्या उषाताई दिंडेंच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

राजेश पाटील

ढेबेवाडी : नऊ वर्षांपूर्वी पतीचे अकस्मात निधन झाले. तीन मुलं आणि स्वतःचाही आधार हरवला. अशा कठीण परिस्थितीत चोहोबाजूला अंधार दाटल्यासारखी परिस्थिती असतानाही त्या खचल्या नाहीत.

फायनान्स कंपनीकडून अर्थसाहाय्य घेऊन त्यांनी प्रवासी व भाजीपाला वाहतुकीसाठी मोटार खरेदी करून मोटार चालवायचे कौशल्यही आत्मसात केले. व्यावसायिकांना भाजीपाला पुरविण्याबरोबरच स्वतःचे भाजीपाला विक्रीचे दुकानही सुरू केले.

तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. जिद्द व आत्मविश्वासाने आयुष्यातील काळोख भेदून पुन्हा ताकदीने उभ्या राहिलेल्या ढेबेवाडीच्या श्रीमती उषाताई वसंत दिंडे (वय ४२) यांची ही कहाणी संकटांनी कोलमडून पडलेल्या कित्येकांसाठी प्रेरणादायी आणि उमेद गळालेल्या पंखात नवे बळ भरणारी ठरावी अशीच आहे.

ढेबेवाडी बस स्थानक परिसरातील एका इमारतीतील भाड्याच्या खोलीत उषाताई दिंडे राहतात. दिंडे कुटुंबांचे पूर्वी येथे कापड दुकान होते. मात्र, अतिक्रमणात ते निघाले. उपजीविकेचा प्रश्न उभा ठाकल्याने त्यांनी मुंबई गाठली.

पती वसंतराव तिथे हमालीचे काम करायचे, तर उषाताई शिवणकाम आणि खानावळ घालून त्यांना हातभार द्यायच्या. पुढे काही कारणास्तव मुंबई सोडून पुन्हा हे कुटुंब गावी आले. गावाकडे कटलरीचे फिरते दुकान त्यांनी सुरू केले.

संसाराचा गाडा कसाबसा पुढे निघाला असतानाच वसंतराव यांचे २०१३ मध्ये अकस्मात निधन झाले आणि उषाताई आणि त्यांच्या तीन लेकरांचा आधारच तुटला. आपणच खचलो तर कुटुंब कोलमडेल, याची जाणीव झाल्याने दुसऱ्याच क्षणी उषाताई अश्रू पुसून आणि स्वतःला सावरत पुन्हा उभ्या राहिल्या.

फायनान्स कंपनीकडून अर्थसाहाय्य घेऊन त्यांनी प्रवासी व भाजीपाला वाहतुकीसाठी मोटार खरेदी केली. आठवडाभरात त्या ड्रायव्हिंग सुद्धा शिकल्या. येथील भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला पुरविण्याबरोबरच स्वतःचे भाजीपाला विक्रीचे दुकानही त्यांनी सुरू केले.

दररोज पहाटे साडेतीन-चार वाजता त्या मोटारीला स्टार्टर मारतात. तासाभरात कऱ्हाडच्या मार्केट यार्डला पोचून त्यांच्यासह बाजारातील इतर महिला व्यापाऱ्यांसाठी खरेदी केलेला भाजीपाला मोटारीत भरून त्या परत येथे येतात.

अनेक वर्षांपासून त्यांचा हा दिनक्रम सुरू आहे. या व्यवसायाने त्यांच्या संसाराला चांगली साथ दिली आहे. मोठ्या मुलीचे लग्न, घरासाठी जागा खरेदी आणि थोडीफार कर्जफेडही त्यातून झालेली आहे. स्वतःचे शिक्षण कमी असले तरी उषाताईंनी तिन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले आहे.

दोन मुली व मुलगा असे तिघेही स्वतःच्या पायावर उभे आहेत. श्रीमती दिंडे यांचे शेड्यूल एकदमच बिझी असते. संत निरंकारी मंडळातही १९९७ पासून त्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. सध्या मंडळात विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. मंडळाच्या अनेक उपक्रमातूनही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आपल्या जीवनातील ते उर्जास्थानच असल्याचे त्या सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT