सातारा

निष्ठूर व्यवस्थेमुळे "आशा'चीच दुर्दशा; सासूने सोडले बेडविना प्राण

हेमंत पवार

कऱ्हाड : पावसाने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे साकुर्डीतील कोरोनाबाधित ज्येष्ठ महिलेला लावलेले ऑक्‍सिजनचे मशिन बंद पडले. त्यामुळे त्यांना धाप लागून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून येथील एका रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. मात्र, एक वाजता आणलेल्या महिलेला सायंकाळपर्यंत रुग्णालयात बेडच मिळाला नाही.

त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह रॅपलिंग कोणी करायचा म्हणून रात्री उशिरापर्यंत तो रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेतच होता. हे सर्व घडलंय कोरोना संकट काळात जीवावर उदार होऊन सर्व्हेचे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेच्या सासूंबाबत. त्यामुळे निष्ठूर व्यवस्थेबाबत आश्‍चर्यच व्यक्त होत आहे.

कोरोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे 
 
साकुर्डी येथील आशा स्वयंसेविकेच्या सासुबाई तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाल्या. त्यानंतर त्यांना कोणत्याही रुग्णालयात बेडच मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून ऑक्‍सिजन यंत्र मिळवून घरीच त्यांना लावले. मात्र, काल रात्री अचानक वादळी पाऊस झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी त्यांचे ऑक्‍सिजन मशिन बंद पडल्याने त्यांचा कृत्रिम श्वास बंद झाला. त्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होऊन त्या अत्यवस्थ झाल्या. त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती.

खवले मांजर नेमकं आहे तरी काय? मोठ्या प्रमाणावर तस्करी का केली जाते? जाणून घ्या नेमकं कारण 

त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी 108 रुग्णवाहिकेतून त्यांच्या सासूबाईंना एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी त्या घेऊन आल्या. दुपारी एक वाजता आलेल्या महिलेला सायंकाळपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये बेडच मिळाला नाही. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी न्या, असे सांगण्यात आले.

नेत्यांनाे! आता हाताची घडी सोडायची वेळ आलीय 

त्यानुसार त्यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, दरम्यान काळात त्यांचा बेडअभावी मृत्यू झाला. मृत्यूनंतरही त्यांचा मृतदेह रॅपलिंग कोणी करायचा म्हणून बराच काळ तो रुग्णालयासमोरील रुग्णवाहिकेतच होता. त्यावरून खल सुरू होता. कोरोना संकट काळात कशाचीही पर्वा न करता काम करणाऱ्या एका आशा स्वयंसेविकाच्या सासूबाबत ही घटना घडली. त्यामुळे या निष्ठूर ट्रिटमेंटबाबत गावातून आश्‍चर्यच व्यक्त होत आहे.

कऱ्हाडच्या बेफिकीर 300 नागरिकांना पोलिसांचा झटका! 

सीईओंचा फोन तरीही नाही बेड... 

आशा स्वयंसेविकेच्या सासूंना हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, आशा प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक करण जगताप, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, तालुका समूह संघटक योगेश सूर्यवंशी यांनी सातत्याने फोन करूनही त्यांना बेड मिळाला नाही. त्यातूनही बेडबाबतचे वास्तव समोर आले आहे.

रस्ता खचला... ग्रामस्थ हतबल; औषधोपचारासाठी साताऱ्यात जाता येईना

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT