Corona Vaccination Center
Corona Vaccination Center esakal
सातारा

'लसीकरण केंद्रावर विनाकारण लुडबुड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा'

राजेंद्र शिंदे

खटाव (सातारा) : खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Khatav Primary Health Center) कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination Center) विनाकारण लुडबुड करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करावेत. दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देताना इतरांना वयोमानानुसार उतरत्या क्रमाने लसीकरण करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते (Zilla Parishad Vice President Pradip Vidhate) यांनी केल्या. (Vice President Pradip Vidhate Demands To File Charges Against The Citizens Who Crowded At The Corona Vaccination Center)

खटावातील लसीकरण केंद्रावर बाहेरील लोकांची लुडबुड वाढली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून हस्तक्षेप करणारांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

खटाव केंद्रावरील लसीकरणात गोंधळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णकल्याण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, उपसरपंच अमर देशमुख, तुकाराम यादव, मुगुटराव पवार, मनोज देशमुख, डॉ. रणदिवे, डॉ. लोंढे, डॉ. अजित पवार, राहुल जमदाडे, पुसेगाव पोलिस ठाण्याचे (Pusegaon Police Station) आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

विधाते म्हणाले, ‘‘खटावातील लसीकरण केंद्रावर बाहेरील लोकांची लुडबुड वाढली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून हस्तक्षेप करणारांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत. लशींचा तुडवडा आहे, तोपर्यंत केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील लाभार्थ्यांचेच आधार कार्ड पाहून लसीकरण करण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.’’ दुसरा डोस घेणाऱ्यांना आदल्या दिवशी माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतीकडून आरोग्य विभागाला दिली जाईल. ही यादी दररोज ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे अमर देशमुख यांनी सांगितले. सकाळी सात वाजल्यापासून उपलब्ध लसीप्रमाणे कर्मचारी हजर लाभार्थ्यांना प्रत्येकी एक प्रमाणे टोकण देणार आहेत.

Vice President Pradip Vidhate Demands To File Charges Against The Citizens Who Crowded At The Corona Vaccination Center

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT