सातारा

राम शिंदे-उदयनराजेंची भेट हुकली!

Balkrishna Madhale

सातारा : खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. आता तसाच पुढाकार धनगर आरक्षणसाठीही घ्यावा, अशी विनंती करण्यासाठी माजी मंत्री व भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे उदयनराजे यांना भेटणार होते. आज दुपारी ४ वाजता ही भेट निश्चित होती. मात्र, काही कारणास्तव उदयनराजे येऊ न शकल्याने ही नियोजित बैठक रद्द झाली असल्याची माहिती राम शिंदे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. 

शिंदे म्हणाले, विरोधात असलं की प्रत्येकजण धनगर आरक्षण देऊ म्हणतो. पण, सत्तेत आल्यानंतर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही. परिणामी आरक्षणाचा प्रश्न जिथे आहे तिथेच राहतो. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा खेळ केला. त्यामुळे धनगर समाजाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण हा राज्याचा प्रश्न असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच, आरक्षणाचा प्रश्न उदयनराजे यांना केंद्राकडून कशाला सोडवायला सांगता, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला होता. असे असले तरी, राम शिंदे मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळण्याकरिता खासदार उदयनराजे यांनाच साकडे घालणार आहेत. राम शिंदे उदयनराजे यांच्याशी विसृत चर्चा करणार आहेत, असे समजते.

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राम शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात चर्चा होणार होती. पण, ऐन वेळी उदयनराजे यांनी काही कारणास्तव बैठकीला येऊ न शकल्याचे कळवले. त्यामुळे ही नियोजित बैठक रद्द झाली. उदयनराजे हे राम शिंदे यांना त्यांच्या एका परिचिताच्या घरी भेटण्यास येणार होते. मात्र, अर्ध्या वाटेतून उदयनराजे यांनी यू टर्न घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, ही भेट रद्द झाली असली तरी, लवकरच ही भेट होणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT