सातारा

मेटेंच्या मराठा 'विचारमंथन'ला सातारच्या दोन्ही राजेंची दांडी!

उमेश बांबरे

सातारा : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकारवरही टीका झाली होती. त्यामुळे पुढे नेमकी कोणती भूमिका घ्यायची, आंदोलनासंदर्भात कोणता निर्णय घ्यायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आरक्षण प्रश्नावर समाजात एकवाक्यता येणे आवश्यक होते. त्याच पार्श्वभूमीवर आज (ता. ३) पुण्यात विचारमंथन बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, पुणे येथे आज झालेल्या मराठा समाजाच्या विचारमंथन बैठकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज, खासदार उदयनराजे भोसले व साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनीही पाठ फिरविली. २५ सप्टेंबरला आमदार विनायक मेटे यांनी स्वतः साताऱ्यात येऊन दोन्ही राजांची भेट घेऊन बैठकीचे विशेष निमंत्रण दिले होते, तसेच दोघांनाही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. 

त्याचबरोबर समाजातील विविध संघटना, क्रांती मोर्चा, समन्वयक, विविध तज्ञ आदींना राज्यभरातून एकत्र आणून एक दिशा एक मागणी, एक विचार नक्की करून त्या पध्दतीने आपापल्या संघटनेने काम करावे, असा निर्णय झाला होता. त्यासाठी मराठा समाजाची विचारमंथन बैठक आज (ता. ३) पुणे येथे आयोजित केली होती. या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी राज्यभर दौरा केला. साताऱ्यात येऊन त्यांनी प्रथम आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या सुरूची या निवासस्थानी भेट घेतली, तसेच पुण्यातील बैठकीस उपस्थित राहण्यासोबतच मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. 

तद्नंतर आमदार मेटे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेज या निवासस्थानी भेट घेऊन निमंत्रण दिले होते. यावेळी दोन्ही राजांनी निमंत्रण स्वीकारून बैठकीस येणार असल्याचे सांगितले होते. पण, दोघांनीही आंदोलनाचे नेतृत्व करण्यास नकार दिला होता. त्यानुसार आज दोन्ही राजे या बैठकीस उपस्थित राहणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही राजे बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात त्यांच्या जवळच्या समर्थकांशी संपर्क साधला असता, खासदार उदयनराजे भोसले हे नाशिकला गेल्याचे सांगण्यात आले. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पुण्यातच असल्याचे सांगण्यात आले. साताऱ्याचे दोन्हीही राजे पुण्यातील बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने त्या मागची कारणे आता मराठा समाजातील कार्यकर्ते शोधू लागली आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT