Leopard esakal
सातारा

पहिला बिबट्या जेरबंद होताच, दुसरा पुन्हा शिवारात; ग्रामस्थ भयभीत

हेमंत पवार

काही ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिलं असून पुन्हा ग्रामस्थांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

कऱ्हाड (सातारा) : ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलाला बिबट्यानं ठार केल्याची घटना आठवड्यापूर्वी येणके (ता. कऱ्हाड) या गावात घडली होती. त्यामुळं तिथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात आज शनिवारी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या (Leopard) जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. मात्र, या बिबट्याला वन विभागानं (Forest Department) ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी नेल्यावर काही वेळातच पुन्हा दुसरा बिबट्या तिथं हजर झाल्यानं ग्रामस्थांत पुन्हा दहशत निर्माण झालीय.

काही ग्रामस्थांनी त्याला पाहिले असून पुन्हा ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येणके गावच्या शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मुक्काम आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. मात्र, बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्यात आलेला नव्हता. मागील आठवड्यात येणके ते किरपे या रस्त्याच्या दरम्यान असलेल्या उसाच्या शिवारात ऊस तोडणी मजुराच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलावर हल्ला करून बिबट्यानं त्याला ठार मारलं होतं. त्यानंतर वन विभागानं संबंधित ठिकाणी शिवारात पिंजरा लावला होता. त्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय.

दरम्यान, जेरबंद केलेल्या बिबट्याला वन विभागानं ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी नेल्यावर काही वेळातच पुन्हा दुसरा बिबट्या तिथं हजर झाल्यानं ग्रामस्थांत पुन्हा दहशत निर्माण झालीय. बॅंकेतील राहुल कदम व अन्य युवकांनी संबंधित बिबट्याला डोंगराकडील शिवाराकडं धूम ठोकताना नुकतेच पाहिले आहे. त्यामुळं पुन्हा ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झालेय. वन विभागानं संबंधित बिबट्याचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT