सातारा

मुसळधार पावसाचा फटका बसलेली गावे 15 दिवसांपासून संपर्कहीन

विजय लाड

उद्ध्वस्त सृष्टीची करुण कहाणीची साक्षीदार असणारी तीन गावे गत १५ दिवसापासून संपर्कहीनच आहेत.

कोयनानगर (सातारा): संपुर्ण कोयना विभागाला मुसळधार पाऊसाचा फटका बसला आहे. या अतिवृष्टीमध्ये विभागातील अनेक गावांवर आपत्तीचा डोंगरच कोसळला आहे. उद्ध्वस्त सृष्टीची करुण कहाणीची साक्षीदार असणारी तीन गावे गत १५ दिवसापासून संपर्कहीनच आहेत. १५ दिवसापासून अंधारात असणारी ही तीन गावे प्रकाशमान झाली आहेत. निसर्गाने मारले तरी प्रशासनाने तारले अशी भावना उष:काल होता होता काळरात्रीत शिकार झालेल्या व संपर्काचा जबरदस्त फटका सहन करणाऱ्या पाच गावांतील जनतेने व्यक्त केली आहे.

२२ जुलै रोजी कोयना विभागात रौद्र स्वरुपाचा झालेल्या पाऊसाने मोठ्या प्रमाणात भूसल्ख्नन होवून मिरगाव या गावांवर आपत्तीचा डोंगर कोसळला आहे. या परिसरातील तीन चार गावात अनेक ठिकाणी छोटया मोठया दरडी कोसळल्यामुळे विजेचे पोला बरोबर रस्ते ही बंद झाल्यामुळे डिचोली, नवजा, मानाईनगर ही गावे संपर्कहीन झाली होती. संपर्कहीन गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी कोयना धरणाच्या जलाशयातून बोटी द्वारे वाहतूक सुरु करून संपर्कहीन गावांसाठी दळणवळणाची सोय प्रशासनाने केली आहे. त्यासाठी ३ बोटी ठेवल्या आहेत.

संपर्कहीन गावात वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवणे ही काळाची गरज असल्याचे ओऴखून महावितरण कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत वीज पुरवठा सुरु करण्यसाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. बोटीच्या माध्यमातून विजेचे खांब सर्व साहित्य व कर्मचारी वाहतूक करून दोन टप्प्यात ऑन ड्यूटी काम केले आहे. या तीन गावातील प्रत्येक घरात महावितरण कंपनीने सौर दिवे देवून या गावातील कायमचा अंधार दूर केला होता. १५ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर अंधारात चाचपडत असणारी ही गावे प्रकाशमान झाली आहेत.

महावितरण कंपनीचे शाखा अभियंता ज्ञानदेव लाड, उमेश जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुनील सुर्यवंशी, चंद्रकात कदम, अमोल कांबळे व टीमने जिवाची बाजी लावून केलेल्या कामाचे कौतुक ऊर्जामंत्री नितीन राऊत व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT