3 forest worker died in fire in nagzira forest in bhandara 
सातारा

2 वर्षीय विराजच्या निर्दयी मृत्यूने वारूंजी झाली सुन्न!

पोलिसांचीही मने हेलावली; आई समजून मावशीच्या कुशीत विसवलेल्या विराजचा दोष नसतानाही गेला बळी

सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड : आई समजून मावशीच्या कुशीत विसावलेला दोन वर्षाच्या निरागस विराज गायकवाडचा वारूजी येथील खून प्रकरणात नाहक बळी गेला. आयुष्याची सुरवातही केली नाही, अशा दोन वर्षाच्या चिमुरड्या विराजचा निर्दयीपणे झालेल्या खूनाने आख्खं वारूंजी गावच हादरले आहे. बंद खोलीत शनिवारी काय घडल, ते आता संशयीत सापडल्यानंतर कळेलही, मात्र मावशीच्या अनैतिक संबधात विराजसारख्या चिमुकल्याचा जीव गेल्याची दाहकता पोलिसांनाही ह्रदयद्रावक ठरली.

काल कऱ्हाडजवळच्या वारूंजी येथे महिलेसह दोन वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. सुशिला सुनिल शिंदे (वय 35) व विराज निवास गायकवाड (दोन वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी सकाळी खुनाची घटना झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता . दोघांचेही मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडले होते. नेमकी घटना काय घडली जाणून घेऊया.

पोलिसांचीही मने हेलावली; आई समजून मावशीच्या कुशीत विसवलेल्या विराजचा दोष नसतानाही गेला बळी

विराजचे मुळगाव वाई तालुका आहे. मात्र काही दिवस तो आजी व मावशी सुशीला सुनील शिंदे सोबत विमानतळ परिसरात राहत होता. विराजची मावशी सुशीलाचे लग्न झाले आहे, मात्र तीचा घटस्फोट झाल्याची पोलिसांची माहिती आहे. खूनातील संशयीत अरिवंद सुरवसे सोलापूर जिल्ह्यातील आहे. सुशीला व अरविंद एकाच हॉटेलवर कामाला होते. यातून त्यांची ओळख झाली. अनैतिक संबंधातून खून झाल्या असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ही माहिती सुशीलाच्या आईला समजली असावी, त्यामुळे सुशीला हिला घराबेहर सोडले जात नव्हते. घराबाहेर पडण्यासाठी सुशीलाने विराजचा वापर केला आणि दोघेही जीवाला मुकले. निर्दयी खुनाची घटना आज उघडकीस आली.

सुरवसे वारुंजी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. विराजला घेवून घराबाहेर पडलेली सुशीला अरविंदच्या दुचाकी वरून गेल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. ही माहिती पोलिसांनी मिळाली आहे. त्यामुळे सुशीला व अरिवंद बद्दलचा संशय बळावला होता. त्या दोघांवरही गुन्हा नोंद झाला आहे. इतक्या निदर्यपणे निरागस विराजसह सुशीलाच्या खूनाचे गुढ संशयित सापडल्यानंतर स्पष्ट होणार आहेच. या सगळ्यात निरागस विराजचा झालेला खून सामान्य नागरीकांसह पोलिसांनीही सुन्न करणारा ठरला आहे.

निरागस विराजला अतिशय निर्दयी व क्रूरपणे मारले, काहीही दोष नसलेल्या विराजच्या निर्दयी खुनाने वारूंजी हादरली आहे. दोन वर्षाच्या विराजचे डोळे मोठे होऊन ते बाहेर आले होते. त्यामुळे तो खून गळा आवळून अन्यथा तोंड दाबून धरल्याने त्याचा श्वास रोखून झाल्याचीही शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT